शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:18 AM

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. यामुळे ...

राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावतीनगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. यामुळे या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होतील.

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी ग्राहकांची गैरसोय

जिवती : तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. अनेक अडचणी येतात.

काळी-पिवळीवरील प्रवासी विनामास्क

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, नवेगाव मोरे-पोंभुर्णा, पोंभुर्णा-मूल, पोंभूर्णा-चंद्रपूर, पोंभूर्णा-आक्सापूर-गोंडपिपरी मार्गावरून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुरू आहे.

नागरिकांना हवे केरोसीन

जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.

महागाईमुळे सर्वच त्रस्त

पिंपळगाव (भो) : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने जनसामान्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. सप्टेंबरपासून काही प्रमाणात सुरळीत सुरू झाले; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढीला लागल्याने मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. आता लॉकडाऊन शिथिल झाले असले तरी महागाई वाढली आहे.

माणिकगड पहाडावर पर्यटनाला वाव

कोरपना : निसर्ग व वनसंपदेने नटलेल्या माणिकगड परिसरात वनविभागाने पर्यटन सफारी सुरू करावी. तसेच येथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे. यामुळे रोजगार मिळणार आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

लोनवाही ग्रामपंचायतच घाणीच्या विळख्यात

सिंदेवाही : तालुक्यात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या लोनवाही ग्रामपंचायत इमारत ही घाण व कचऱ्यात असल्याने लोनवाही यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नवीन इमारतीच्या बाजूला संपूर्ण घाण पसरलेली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार या इमारतीमधून चालत आहे. नवीन इमारतीचे उद्घाटन होऊन दहा महिन्यांचा काळ लोटला असून, विकास मात्र शून्य झाला आहे. लोनवाही ग्रामपंचायतमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रथम घाणीचे दर्शन होऊन नंतर ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करावा लागतो. अजूनही संपूर्ण गावाचा कचरा बाजूच्या खड्ड्यात टाकला जात आहे. या कचऱ्याची दुर्गंधी येऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने जर सभोवताली कुंपण किंवा वृक्षारोपण केले असते तर ग्रामपंचायत इमारत सुंदर व देखणी स्वरूपात दिसली असती. ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागते. ग्रामपंचायत मधील स्वच्छतागृहात नळ आहे, पण नळाला पाणीच नाही. लोनवाही ग्रामपंचायतला नवीन यंग कारभारी मिळाल्याने लोनवाहीवासीयांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे समस्याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पावसात अपघात वाढणार आहेत.

नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी

तळोधी बा : नागभीड तालुक्यातील नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, अशी मागणी नांदेड ग्रामपंचायतीने केली आहे.

तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना उपचाराकरिता तळोधी बा.येथे यावे लागते. नांदेड हे मध्यवर्ती ठिकाण असून, या सभोवताल ११ गावांचा संपर्क येतो. याठिकाणी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे नांदेड ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.