शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा ‘भुजंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:24 AM

फोटो पोंभुर्णा : वरण-भात सोडा साधे बिस्कीटही न खाता कुणी फक्त दूध पिऊन जगू शकतो का.? आश्चर्य आहे ...

फोटो

पोंभुर्णा : वरण-भात सोडा साधे बिस्कीटही न खाता कुणी फक्त दूध पिऊन जगू शकतो का.? आश्चर्य आहे ना..! पण हे सत्य आहे. जन्मापासून तर आज वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तो फक्त दूध आणि दूधच पिऊन जगतो आहे. पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील भुजंग गुरुदास मडावी असे त्याचे नाव आहे. गावकरी त्याला 'आऊ' म्हणतात.

भुजंगचा जन्म २३ ऑगस्ट २००५ ला जामखुर्द येथे अत्यंत हलाखीचे जीवन जगणाऱ्या कुटुंबात झाला. वडील गुरूदास व आई सुनिता दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. साधारण जन्म झालेला भुजंग मात्र असाधारण अनुभव देत होता. भुजंगचा जन्म झाल्यानंतर तब्बल १२ दिवस त्याने आपले डोळेच उघडलेले नव्हते. शिवाय त्याने आईचे दूधही प्याले नाही. कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

बरीच खटपट झाली. शेवटी तेराव्या दिवशी भुजंगने आपले डोळे उघडून आईचे दूध पिले. सर्व चिंतामुक्त झाले.

भुजंग सहा महिन्यांचा झाल्यानंतर वरण-भात व खिचडी खाऊ घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण अन्नाचा एक कणही त्याने तोंडात घेतला नाही. भूक लागली की तो फक्त दुधासाठी किंचाळत असे. हा प्रकार अनेक दिवस चालला. नेमकी काय अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. उपचार करण्यात आले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अनेक तपासण्याअंति तो फिट आढळून येत होता. त्यामुळे भुजंगची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी पुष्टी केली.

वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. तोपर्यंत त्याने अन्नाचा कणही तोंडात घेतला नाही.

आज भुजंग १७ वर्षांचा आहे. तो अजूनही फक्त दूधच पितो. वरण- भात नाही, बिस्कीट नाही की चाॅकलेट नाही. दूध हाच त्याचा आहार. एक शेर सकाळी एक शेर संध्याकाळी. कधी पैसे असले की दुपारी एक शेर दूधच. बस हाच त्याचा आहार आहे. फक्त अर्ध्या पायली दुधावर त्याला त्याची भूक भागवावी लागते. भुजंगचे वय जसे वाढत आहे, तशी त्याची पोटाची भूकही वाढत आहे. गरिबीने लाचार झालेल्या त्याच्या वृद्ध आई-वडिलांना भुजंगचा सांभाळ कसा करायचा, हा मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. पैसे नसल्याने अनेकदा भुजंग उपाशीपोटी झोपत असतो. पण तो आई-वडिलांकडे तक्रार करीत नाही. वृद्ध आई-वडिलांच्या दारिद्र्याकडे बघून हे निमुटपणे सहन करतो.

बॉक्स

अनेकदा झोपावे लागते उपाशीपोटी

आई, वडील मोलमजुरी करतात, मिळेल ते काम करतात. पण गावखेड्यात दररोज काम मिळेल असे नसते. म्हणून पैशाच्या अभावी अनेकदा भुजंगला दूध मिळत नाही. अनेकदा त्याला रात्री उपाशी पोटीच झोपावे लागले आहे.

बॉक्स

शिक्षण म्हणजे वहीवर रेषा ओढणे

भुजंगला शाळेत घातले. इयत्ता पहिली ते सातवीचे शिक्षण जामखुर्द येथेच पूर्ण केले आहे. आठवीपासून तो देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात शिक्षण घेत आहे. तो यावर्षी दहावीत आहे.

भुजंगचे शिक्षण म्हणजे वहीवर रेषा ओढून घेणे. शिक्षणाचा संपूर्ण सार तो आपल्या रेषांमध्ये शोधतो. मास्तरांच्या प्रत्येक शिकवणीत तो ध्यानस्त बसून बघतो. भुजंगला लिहिता, वाचता, बोलता येत नाही. मात्र त्याला बोललेलं सर्व कळते. त्याची जिभ जाड असल्याचे बोलले जाते. तो शाळेला 'बेलम' व पैशाला 'खुणाल' म्हणतो.

कोट

माझा मुलगा भुजंग हा लहानपणापासून दूधच पिऊन जगत आहे. आजपर्यंत अन्नाचा कणही त्याने तोंडात घेतला नाही. मुलाचे वय जसे वाढत आहे, तशी त्याची भूकही वाढत आहे. गरिबीमुळे त्याची गरज पूर्ण करण्यासाठी मी हतबल आहे.

-गुरुदास मडावी, भुजंगचे वडील