लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात १२ ऑगस्टच्या मध्यरात्री ६५ वर्षाच्या महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील असून कोरोनामुळे झालेला जिल्ह्यातील सातवा मृत्यू आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९८८ वर पोहोचली आहे. गुरुवारी नव्या ४४ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनातून ५७९ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ४०० बाधितांवर उपचार सुरू आहे.गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २४, चंद्रपूर तालुक्यातील तीन, राजुरा, नागभीड, गडचांदूर येथील प्रत्येकी एक, बल्लारपूर शहरातील ९, गोंडपिपरी येथील बाच बाधितांचा समावेश आहे.चंद्रपुरातील शांतीनगर परिसरातील एक, शकुंतला अपार्टमेंट रामनगर परिसरात एक, हनुमान मंदिर इंदिरानगर परिसरातील एक, फॉरेस्ट एंट्री गेट परिसरातील एक, तुकूम परिसरातील तीन, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील एक, अंचलेश्वर गेट भानापेठ येथील एक, बापट नगर माता मंदिर जवळील एक, गुरुदेव लॉन रिद्धी अपार्टमेंट परिसरातील एक, दडमल वार्ड परिसरातील दोन, जनता कॉलेज परिसरातील एक, लालपेठ चौक येथील दोन, सिव्हील लाईन येथील एक, वरवट वार्ड नंबर ३ येथील एक, श्री गुरुदत्त संकुल परिसरातील दोन, चव्हाण कावेरी कारखाना परिसरातील एक तर निर्माण नगर परिसरातील एका बाधितांचा समावेश आहे. चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर परिसरातील ऊर्जानगर येथील दोन, वार्ड नंबर ३ नकोडा घुग्घूस येथील एक तर श्रीराम वार्ड नंबर २ येथील एका बाधिताचा समावेश आहे. सर्वांना कोविड सेंटरमध्ये हलविले आहे.राजुरा येथील धोपटाळा कॉलनी परिसरातील एक बाधित पुढे आला आहे. गोकुळ नगर बल्लारपूर येथील ९ बाधित पुढे आले आहेत. गोंडपिपरी येथील बिडिओ कॉर्टर परिसरातील एक, आझाद हिंद बाजार वार्ड परिसरातील एक, वार्ड नंबर ३ परिसरातील एक तर गोंडपिपरी शहरातील दोन बाधितांचा समावेश आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर तर गडचांदूर येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात १७ हजार 192 नागरिकांची अॅन्टिजेन तपासणी केलेली आहे. यापैकी १९४ पॉझिटिव्ह असून १६ हजार ९९८ निगेटिव्ह आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यात सातवा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 5:00 AM
राजुरा येथील धोपटाळा कॉलनी परिसरातील एक बाधित पुढे आला आहे. गोकुळ नगर बल्लारपूर येथील ९ बाधित पुढे आले आहेत. गोंडपिपरी येथील बिडिओ कॉर्टर परिसरातील एक, आझाद हिंद बाजार वार्ड परिसरातील एक, वार्ड नंबर ३ परिसरातील एक तर गोंडपिपरी शहरातील दोन बाधितांचा समावेश आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर तर गडचांदूर येथील प्रत्येकी एक बाधित पुढे आले आहेत.
ठळक मुद्देनवे ४४ बाधित : जिल्ह्यातील बाधितांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर