शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

मल:निस्सारण योजना ग्रहणांकित

By admin | Published: June 25, 2017 12:29 AM

चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भुयारी मल:निस्सारण योजना आठ वर्र्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली.

नियोजनाचा अभाव : आठ वर्षानंतरही भिजत घोंगडे; कोट्यवधींच्या खर्चात नव्याने भरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भुयारी मल:निस्सारण योजना आठ वर्र्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासूनच या योजनेला ग्रहण लागले होते. हे ग्रहण आजतागयत सुटू शकले नाही. या योजनेची प्रस्तावित किंमत योजना पूर्ण होऊ शकत नसल्याने सातत्याने वाढत राहिली. आतापर्यंत यात कोट्यवधींचा खर्च झाला असला तरी ही योजना योग्यरीत्या केव्हा कार्यान्वित होईल, याबाबत अजूनही संभ्रम आहे. चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर अनेक नवीन योजना प्रस्तावित आहेत. मात्र आजवर एकही योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही. २००७ मध्येच या योजनेबाबत नगरपालिका स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. २००९-१० मध्ये भूमिगत मल:निस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २०१७ उजाडले आहे. मात्र भूमिगत मल:निस्सारण योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या योजनेत जे काम करण्यात आले. त्याचाही खेळखंडोबाच झालेला आहे. रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यात आला. मात्र नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येतो. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लान्ट पठाणपुरा परिसरात आहे. अनेक वॉर्डात पाईप लाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. याशिवाय या योजनेतील पाईल लाईनची शहरातील मालमत्तेंशी जोडणीही झालेली नाही. ही योजना कशी काम करेल, याची तत्रज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र अशी तपासणीही करण्यात आलेली नाही. २०१७ चा उन्हाळा संपला. मात्र या कालावधीतही या योजनेचे काम बंदच होते, अशी माहिती आहे.योजना अपूर्ण; मात्र जोडणी शुल्काची आकारणीभुयारी मल:निस्सारण योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. या योजनेतील अनेक कामे शिल्लक आहे. तरीही मनपाच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात नागरिकांकडून भुयारी मल:निस्सारण जोडणी शुल्क व वार्षिक शुल्क आकारण्याची प्रस्तावित केले आहे. मागील वर्षीच्या अंदाजपत्रकातही हे शुल्क आकारले होते. मात्र योजनाच कार्यान्वित झाली नाही. योजनेची वाढली किंमतभूमिगत मल:निस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. आता पुन्हा योजनेची किंमत वाढून ती १०० कोटींच्याही पार गेली आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर पुन्हा जादा खर्च करावा लागणार आहे.