शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

शिकवणीच्या नावावर विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण; आरोपी शिक्षक हा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 2:45 PM

Chandrapur : घडलेली घटना कुणालाही सांगितली तर आई वडिलांना मारण्याची दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे.

अमोल लोडे हा कोरपना येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता. यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. मात्र, भीतीपोटी त्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. दरम्यान, मंगळवारी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कोरपना शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्यावर कलम ३७६ पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी 'लोकमत'ला दिली. आणखी असे प्रकार संबंधित शिक्षकाने केल्याची माहिती तपासात उजेडात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी लैंगिक अत्याचार केल्यानंतर शिक्षक लोडे यांनी पीडित विद्यार्थिनीला ही बाब कुणालाही सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने घाबरून ही माहिती कुणालाही दिली नाही. दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पीडिताला विचारले असता तिथे आपबीती कथन केली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर