२१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात : तीन आरोपींना अटकसावली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी रोडवरील हरणघाट येथे सुमारे २१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल अवैध दारूसह पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.हरणघाट रस्त्यावरुन सावलीकडे अवैध दारू येत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सापळा रचून बोलेरो पीकअप वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्यात गोवा नामक विदेशी दारूच्या ३२ पेट्या आढळून आल्या. त्याची किंमत ४ लाख ६० हजार ८०० रुपये आहे. या प्रकरणी सावली येथील मोसम दत्तात्रय सुरमवार (३३), राहुल श्रावण गोलाईत (२३) रा. चामोर्शी आणि राहुल रेशीम डोंगरवार (२७) रा. पुराडा ता. कुरखेडा या तीन आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले. पोलिसांनी बोलेरो पिकअप क्र.सी.जी. ०८ वाय ५८९७ किंमत ७ लाख ५० हजार असा एकूण २१ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई सावलीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात उत्तम कुमरे, केवळराम उईके, प्रदीप सोनुने, शिपाई अनुप कवठेकर, सचिन सायंकार, अतीश मेश्राम, प्रफुल्ल आडे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)तस्करीसाठी लढविली नवी शक्कलबोलेरो पिकअप या वाहनात दारूच्या अवैध वाहतुकीसाठी विशिष्ट कप्पा तयार करून त्यात दारूच्या पेट्या ठेवल्या होत्या. सकृत दर्शनी त्या कोणाच्याही निदर्शनात येऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आधी पेट्या दिसल्या नाहीत. मात्र सावली पोलिसांनी बारकाईने तपासणी केल्यानंतर अवैध दारूच्या ३२ पेट्या आढळून आल्या, हे विशेष. अवैध दारू वाहतुकदार अनेक प्रकारे शक्कल लढवत दारूची वाहतूक करीत असल्याचे यातून स्पष्ट होते.
सावली पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 12:56 AM