वायुदलाच्या विमानाने आले पार्थिव : अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी केली गर्दीचंद्रपूर : काश्मिरातील उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी होऊन नंतर वीरगती प्राप्त झालेले शहीद जवान विकास जनार्दन कुडमेथे यांच्या पार्थिवाला चंद्रपुरातील मोरवा विमानतळावर शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले आणि आदरांजली वाहिली.मंगळवारी दुपारी १२.१५ शहीद जवान विकास जनार्दन कुडमेथे यांचे पार्थिव वायुदलाच्या हेलिकॉप्टरने चंद्रपुरातील मोरवा विमानतळावर आणण्यात आले. येथे पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. केंद्रीय गृराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्यासह अनेकांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर विशेष वाहनाने हा ताफा शहीद जवानच्या पुरड (नेरड) ता. वणी या मुळ गावी रवाना झाला. यावेळी उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे, राजेश मुन, नगरसेविका अंजली घोटेकर, वनश्री गेडाम, सुषमा नागोसे यांच्यासह चंद्रपुरातील अनेक नागरिकांची तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)पाकिस्तानला योग्य वेळी उत्तर- हंंसराज अहीरयावेळी पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देताना ना. हंसराज अहीर यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषध व्यक्त केला. हे कृत्य देश खपवून घेणार नाही. पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तानला योग्य वेळी उत्तर दिले जाईल. देश वीर जवानांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी परिसर निनादलाशहीद विकास कुडमेथे यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी रवाना होण्यापूर्वी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाला फुष्पांजली वाहिली. यावेळी नागरिकांच्या भावना अनावर होत्या. शहीद जवान विकास कुडमेथे अमर रहे, या घोषणांसह पाकिस्तान मुर्दाबादचेही नारे यावेळी लावण्यात आले. विमानतळानंतर मोरवा गावाजवळही नागरिकांनी गर्दी केली होती.
शहीद जवानाला चंद्रपुरात प्रशासनाची सलामी
By admin | Published: September 21, 2016 12:43 AM