यशात आईचे योगदान मोठेच : मातृदिनी माता झालेल्या गृहिणींना मदत
चंद्रपूर : विश्वात पहिले पाऊल ठेवताच मातेची कूस लाभते. पुढे, नव्हे तर नेहमी हीच कूस आधार देत राहते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, यशापयशात वडिलांसोबत मायेची ऊबही अंगात बळ देत राहते. आपल्या यशातही मातेचे योगदान अनन्यसाधारण आहे. तिचे ऋण फेडता येणे शक्य नाही. मात्र मातांचा सन्मान करून सृष्टीतल्या मातृत्वालाच वंदन करणेेेेे, हे आपले आद्य कर्तव्य समजत डॉ. शलाका सुधीर मुनगंटीवार हिने मातृदिनी माता झालेल्या आईंचा सन्मान केला.
डॉ. शलाका म्हणजे राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुकन्या. डॉ. शलाका मुनगंटीवार सध्या मुंबईत रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या रेडिओलॉजिस्ट होण्यामागे त्यांच्या आईने घेतलेले परिश्रम महत्त्वाचे आहेत. हे डॉ. शलाका विसरली नाहीय. म्हणून मातृदिनी आपल्या आईविषयी अर्थात सपना मुनगंटीवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी मातांचा सन्मान करत अभिनव पद्धतीने मातृदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपूर येथील रुग्णालयात १३ मातांनी बाळांना जन्म दिला. त्या १३ ही मातांना ११ हजार रुपयांचे धनादेश देत डॉ. शलाका मुनगंटीवार यांनी मातृत्वाला वंदन केले.