निजामकाळात १ मे १९४३ रोजी या शाळेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला १ ते २ पर्यंतचे मराठी व उर्दू माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर चौथा वर्ग, कालांतराने सातव्या वर्गापर्यंत व अलीकडेच दहा वर्षांपूर्वी सेमी इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची सोय येथे करण्यात आली. या शाळेतून आजवर अनेक उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, न्यायमूर्ती, डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, आर्किटेक्चर, पत्रकार, व्यवसायिक आदी पेशात विद्यार्थी घडले. सुमारे दीड ते दोन एकर जागेत ही प्रशस्त शाळा उभी आहे. यामध्ये शालेय वास्तू, क्रीडांगण, खुले रंगमंच आदी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांत हिरिरीने भाग घेऊन आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे शाळेचा नावलौकिक संपूर्ण तालुक्यात आहे.
ती शाळा करतेय ७८ वर्षांपासून विद्यादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:26 AM