वसंत खेडेकर।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : कुत्रे आणि कोंबडी यांच्यामध्ये फार मोठे शत्रुत्व राहात नसले तरी त्यांचे एकमेकांशी खूप पटते. एखाद्या कुत्रीने कोंबडीच्या पिल्ल्याला ममत्त्वाने आपल्या कुशीत घेवून त्याला पोटच्या गोळ्याप्रमाणे लाड करावे, एवढे सख्य तर त्यांचेत नक्कीच राहात नाही. परंतु एका कुत्रीचे कोंबडीच्या एका पिलावर जडलेले आईचे प्रेम शहरातील राजू शर्मा यांच्या शेतात बघायला मिळत आहे.राजू शर्मा यांची वर्धा नदी काठावर शेती आहे. तेथेच त्यांचा दूधाचा व्यवसाय आहे. तेथे कौलारू लहानसे घर असून आश्रयाला काही कुत्रीही राहतात. त्यातील एका कुत्रीने सहा दिवसांपूर्वी दोन पिलांना जन्म दिला. दोन दिवसानंतर एका कुत्र्याने त्यातील एका पिल्याला उचलून नेऊन त्याचा फडशा पाडला. त्यामुळे चवताळून कुत्रीने त्याचा पाठलाग करून तेथून हुसकावून लावले. परत येताना तिने कोंबडीचे पांढºया रंगाचे पिल्लू तोंडात धरून ती राहात असलेल्या ठिकाणी आणले. ते बघून ही कुत्री आता कोंबडीच्या त्या पिलाचा फडशा पाडणार, असे शर्मा यांना वाटले. मात्र, तसे काहीही घडले नाही.कुत्री आपल्या पिल्ल्यासोबत कोंबडीच्या पिलाला आपल्या कुशीत घेवून त्याला चाटतात. त्याचे लाड करतात, हे चित्र सहजपणे पाहायला मिळते. या घटनेला पाच दिवस झालेत. कोंबडीचे पिल्लू तिचे सोबतच राहत आहे. तिच्या अंगाखांद्यावर खेळत आहे. पिल्लू तिच्यापासून कदापि दूर जात नाही. थोडे दूर गेले की ती त्याचा लगेच सुगावा घेते. हे बघून कुणाचा कधी कुणावर जिव्हाळा बसेल, हे सांगणे अशक्य असल्याची प्रचिती या घटनेने आणून दिली आहे. कुत्रीला कोंबडीच्या पिलाचा एकाएकी एवढा लळा लागण्याचे कारण हे एक गुढ असल्याचे मानले जात आहे.हे तर जिव्हाळ्याचे शेतपिलाला जन्म देताच गाईने प्राण सोडला. निराधार झालेल्या त्या वासराला दुसऱ्या एका जर्सी जातीच्या गाईने जवळ केले. आपले दूध त्याला पाजू लागली. मायेने चाटून त्याला आईचे प्रेमही देऊ लागली. ते वासरू आता बरेच मोठे झाले आहे. ही घटना राजू शर्मा यांच्याच शेतातील आहे.
‘ती’ कोंबडीच्या पिलाला घेते कुशीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:51 PM
कुत्रे आणि कोंबडी यांच्यामध्ये फार मोठे शत्रुत्व राहात नसले तरी त्यांचे एकमेकांशी खूप पटते.
ठळक मुद्देविजोड प्राण्यांचे ममत्त्व