आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने मध्यान्ह भोजन सुरु करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना मुंगदाळ, मसुरदाळ, वटाणा, मटकी या कडधान्याचा पोषण आहार तयार करुन दिला जात होता. इयत्ता १ ते ८ विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार दिले जात होते. बचत गटाच्या महिलांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या आहारासाठी १५० रुपये व २.१६ पैसे दराने इंधन व भाजीपाला खर्च प्रती विद्यार्थी दिले जात होते. त्यामुळे अनेक बचतगटांच्या महिलांना रोजगार मिळाला होता.परंतु, धान्य व साहित्य पुरवठा करण्यासाठी कंत्राटदार न मिळाल्याचे कारण पुढे करीत धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. धान्य पुरवठा सुरळीत सुरू होईपर्यंत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांना शासनाने पत्र देवून पंधरा दिवस विद्यार्थ्यांना पोषण आहार लागणारे साहित्य स्वत:च्या खर्चाने आणावे, असे कळविले आहे.मात्र अनेक शाळा व्यवस्थापन समित्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने अनेक शाळांनी पोषण आहार तयार करणे बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारपासून वंचित आहेत. मुख्याध्यापकांनी स्वत: जर साहित्य खरेदी करुन विद्यार्थ्यांना आहार दिले तरी त्याचे बिल कधी मिळणार, हे प्रशासन व शासनाकडे उत्तर नसल्याने शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी शासनाच्या पत्राकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शालेय पोषण आहार वाटप बंद आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात एक महिन्यापासून शालेय पोषण आहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:38 PM
शासनाकडून शालेय पोषण आहार साहित्याचा पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील खासगी व जि.प. च्या जवळपास १५० शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
ठळक मुद्दे१५० शाळेचे हजारो विद्यार्थी वंचितपुरवठा कंत्राटदारच मिळत नसल्याची बोंब