लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुभार्वाच्या काळात निराश्रीत निराधार बेघर व विमनस्क अवस्थेत असणाऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर तालुकास्थळी १ हजार ३०० थाळी दररोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांतही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असणाºया नागरिकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा शिव भोजन योजनेने उपलब्ध केली. कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. शिव भोजन थाळीची किंमत १० रूपयांवरून आता केवळ ५ रूपये केली आहे. यामुळे अल्प उत्पन्न असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.सर्व तालुक्यात केंद्र सुरू होणारजिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे संचारबंदीच्या काळात ही उपाययोजना चंद्र्रपूर शहरासह वरोरा, राजुरा,बल्लारपूर या तीन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये सुरू आहे. शिवभोजन थाळीचे स्वरूप संचारबंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे.अडचणीतच खरी गरजशिवभोजन थाळीचे वितरण करताना छायाचित्र काढले जाते. यामुळे गरजू, गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र अॅपवरही दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची खरी उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात सिद्ध होत आहे.
शिवभोजन थाळी देत आहे हजारो निराश्रितांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 9:35 PM
राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असणाºया नागरिकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा शिव भोजन योजनेने उपलब्ध केली.
ठळक मुद्देदररोज १ हजार ३०० पॅकेट्स वाटप : लॉकडाउनच्या काळात थाळी ठरली संजीवनी