लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस व विजेचे दर भरमसाठ वाढले आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.महागाई कमी करू, असे आश्वासन देत भाजपाने सत्ता मिळविली. मात्र आता प्रत्येक वस्तूंचे दर वाढवून भाजपा सरकार सर्वसामान्याची पिळवणूक करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आ. बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार हे या मोर्चाचे नेतृत्व करणार होते. मात्र ते काही कारणासाठी बाहेरगावी असल्याने जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, शहर प्रमुख व नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षक सेना जिल्हा प्रमुख अजय कोंडलेवार, चंद्रराज बातो, विशाल मत्ते, लक्ष्मण तोकला आदी उपस्थित होते.बल्लारपुरातही आंदोलनबल्लारपूर : शिवसेनेचे नेते दिलीप कपूर व उपजिल्हा प्रमुख नगरसेवक विनोद उर्फ सिक्की यादव यांच्या नेतृत्वात येथील तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार विकास अहीर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात नगरसेविका रंजिता बिरे, माजी नगरसेवक प्रभाकर मुरकुटे, जीवन बुटले, मोझरकर, प्रदीप गेडाम, बाबा शाहू, ज्योती गहलोत, प्रगती झुल्लारे, प्रणय काकडे, प्रकाश पाठक यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.शिवसेनेकडून महागाईच्या विरोधात आंदोलनमूल : तालुका शिवसेनेच्या वतीने भाववाढीच्या विरोधात येथील गांधी चौकात बुधवारी निषेध करून वीज बिलाची होळी करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी गांधी चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेश सरवदे यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठविले. आंदोलनात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत गड्डमवार, नितीन येरोजवार, सुनिल काळे, महेश चौधरी, युवासेना शहर प्रमुख सचिन वाढई, शहर प्रमुख संदीप मोहुर्ले, ओमदेव मोहुर्ले, महिला आघाडीच्या गुड्डी डोर्लीकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचा महागाईविरूद्ध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:32 PM
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस व विजेचे दर भरमसाठ वाढले आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.महागाई कमी करू, असे आश्वासन देत भाजपाने सत्ता मिळविली. ...
ठळक मुद्देजोरदार घोषणाबाजी : महागाई व सरकारचा निषेध