अधिष्ठाता यांना निवेदन : मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्व सामान्य जनतेला आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे सिकलसेल, एचआयव्ही यासारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्त दिले जात नाही. त्यांना रक्तासाठी भटकंती करुन बाहेरुन रक्त विकत घ्यावे लागत आहे. बहुतांश रुग्ण गोर-गरीब असल्यामुळे त्यांना बाहेरून रक्त व औषधी घेणे परवडण्यासारखे नाही. रुग्णालयामध्ये अस्वच्छता असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू, क्षयरोग, डेग्यू यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे, अशा विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने गुरूवारी आंदोलन करण्यात आले.जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णाला योग्य जेवण मिळत नाही. खाटांची व्यवस्था अपुरी पडत असून रूग्णाला योग्यरित्या सहकार्य केले जात नाही. काही दिवसांपूर्वी शासकीय महाविद्यालयात चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांची रिक्त पदे निघाली होती. त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. अशा असंख्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी शिवसेना विधानसभा कार्यालय, जैन भवन, चंद्रपूर येथून शिवसेना नेते उपजिल्हा प्रमुख तथा शिवसेना विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान आठ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रवींद्र लोनगाडगे, विशाल निंबाळकर, माया पटले, सायली येरणे, संतोषी चव्हाण, सुजाता बल्ली, शांताबाई धांडे, राकेश जयस्वाल, दीपक पद्यगिरीवार, सुधीर माजरे, विनोद गोल्लजवार, रुपेश पांडे, अमोल शेंडे, कलाकार मल्लरप, राजेंद्र पुलीपाका, नितीन नागरिकर, विनोद गरडवा, रुपेश पांडे, प्रकाश चंदनखेडे, कैलास धायगुडे, इरफान शेख, विलास सोमलवार, गणेश शेंडे, हेमराज बावणे, इमरान शेख, स्वप्नील वाढई, सुल्तानभाई, विनोद अनंतवार, विलास सोमलवार, करन बैस, गौरव जोरगेवार, दिलीप बेंडले उपस्थित होते.शिवसेनेच्या आरोग्य शिबिरातून अनेकांवर उपचार शासकीय रूग्णालयात रूग्णांशी नेहमीच अरेरावी केली जाते. त्यांना वेळेवर सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. शिवसेनेतर्फे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी अनेकदा आरोग्य कॅम्प घेण्यात आले. यातून आरोग्य समस्या निकाली निघाली मात्र रूग्णालयाचे दुर्लक्ष झाले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा
By admin | Published: June 23, 2017 12:34 AM