जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बैलगाडीसह शेतकरीही सहभागी झाल्याने नागरिकांसाठी लक्षवेधी ठरल्याचे दिसून आले.
पेट्रोल व डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला. जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने दरवाढ होत असल्याने महागाईचे चटके बसत आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यावर पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे भाव कमी करू, असे आश्वासन दिले होते मात्र, हे आश्वासन खोटे निघाले, त्यामुळे पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केली. मोर्चाची सुरूवात जटपुरा गेटपासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरूद्ध नारेबाजी केली. आंदोलनात शिवसेना, युवासेना व महिला सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारचा निषेध
सिलिंडरचे दर वाढविल्याने सर्वसामान्य कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलसह सिलिंडरचे दर भडकले, असा आरोप महिलांनी केला. दरम्यान, हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाेहोचल्यानंतर महिलांनी चुलीवर प्रतिकात्मक स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.