लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जनआशिर्वाद दौऱ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने मंगळवारी जिल्ह्यात समर्थन व निषेधार्थ पडसाद उमटले. सिंदेवाहीत शिवसेनेची निदर्शनेसिंदेवाही : शहरात शिवसेना व युवासेनेने निदर्शने करून नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख आशीष चिंतलवार, शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र मंडलवार, युवासेना तालुका प्रमुख पंकज ननेवार, विकास आदे, ग्रा. पं. सदस्य दुर्वास मंडलवार, योगेश चांदेकर, कृष्णा मेश्राम, ललीत गुज्जेवार, हर्षल शेरकुरे उपस्थित होते.गोंडपिपरीतही निषेधगोंडपिपरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद गोंडपिपरीत उमटले. ठाणेदार संदीप धोबे यांना निवेदन दिले. निषेध आंदोलनात जिल्हा उपप्रमुख संदीप करपे, तालुका प्रमुख सूरज माडूरवार, शैलेश बैस, अशपाक कुरेशी, विवेक राणा, तुकाराम सातपुते, बळवंत भोयर सहभागी झाले होते.
‘कोंबडीचोर’ म्हणून शिवसेनेचा आरोपचंद्रपूर : चंद्रपुरात शिवसेना जिल्हा कार्यालय ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल वरोरा नाका चौकापर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरूद्ध जोरदार नारेबाजी करीत निषेध रॅली काढली. राणेंच्या प्रतिकात्मक छायाचित्राचे शिवसेनेने दहण केले. शिवाय ‘कोंबडीचोर’ म्हणून आरोप केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले, नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदावर आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे देशात प्रथम क्रमांक पटकाविलेले मुख्यमंत्री म्हणून गौरविण्यात आले, त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही. राणे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाप्रमुख गिऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनातून केली. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेळखडे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, कुसुम उद्गार, वर्षा कोटेकर, स्वनिल काशीकर, विनय धोबे, सुमित अग्रवाल, हेमराज बावणे, वसीम शेख, इलियास शेख, सिकंदर खान, सोनू ठाकूर, बाळू भगत आदी उपस्थित होते.
राणेंच्या अटकेविरूद्ध भाजप रस्त्यावर चंद्रपूर : राज्य सरकारने दडपशाहीद्वारे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याचा आरोप करून भाजपनेही मंगळवारी चंद्रपुरातील गांधी चौकात निषेध केला.केंद्रीय मंत्री राणे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. यात्रेचाच एक भाग म्हणून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या काही वक्तव्यांचा आधार घेत राज्य सरकारने अटक केली. ही अतिशय गंभीर बाब असून महाराष्ट्रात यापुढे मत स्वातंत्र्य अस्तित्वात राहणार आहे की नाही, असा प्रश्न भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी विचारला. आंदोलनात महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, महानगर सरचिटणीस सुभाष कासनोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमोचे महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, खुशबु चौधरी, छबू वैरागडे, शिला चव्हाण, वंदना तिखे, बंटी चौधरी, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, राहूल गावळे, राखी कानलावार, शैलेश इंगोले, बाळू कोलनकर, सत्यम गाणार सहभागी झाले होते. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर यांना निवेदन सादर केले.