चंद्रपूर : गरीब, तसेच गरजूंना ताजे अन्न मिळावे, यासाठी महाआघाडी सरकारने राज्यात शिवभोजन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात २७ शिवभोजन केंद्र असून, आता नव्याने तुकूम परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे गरजवंतांना याचा लाभ होणार आहे.
विकलांग सेवा संस्था, चंद्रपूर या संस्थेला हे केंद्र देण्यात आले असून, या केंद्राचे उद्घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी शालिक भराडी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेंद्र दांडेकर, निरीक्षण अधिकारी भारत तुबडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. या केंद्रातून दररोज शंभर शिवभोजन थाळींचे वितरण होणार असून, गरीब, तसेच गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शालिक भराडी यांनी केले आहे.
010821\01cpr_1_01082021_32.jpg
शिवभोजन केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर.