बल्लारपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बामणी येथील ग्रामपंचायत सभागृहात सन २०२२-२३चे समृद्ध बजेट तयार करण्याकरिता शिवारफेरी व गावफेरी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात बामणी ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष ताजने, सचिव लक्ष्मण शेंडे, सदस्य चंदू घाटे, दिलीप काटोले, कमलबाई कोडापे, बल्लारशाह वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक नरेश भोवरे, कृषी सहाय्यक राहुल अहिरवार,पंचायत समिती, बल्लारपूरचे तांत्रिक सहाय्यक राजेश बट्टे, ‘उमेद’चे तालुका समन्वयक पंकज गणवीर, विश्वास महिला ग्राम संघाच्या सविता कर्डेवार, रंजना गोंधळी, लता घुंगरूटकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात समृद्ध बजेटवर चर्चा करण्यात आली व योजनेसंबंधी माहिती देण्यात आली. याशिवाय शिवारफेरी काढून मनरेगा अंतर्गत कामगारांना कामाच्या ठिकाणी घेऊन जाणे याचे महत्व पटवून देण्यात आले. मनुष्य निर्मिती दिवस कामाला सहकार्य करण्याचे आश्वासन क्षेत्र सहाय्यक नरेश भोवरे यांनी दिले. सूत्रसंचालन लक्ष्मण शेंडे यांनी केले व प्रस्तावना राजेश बट्टे यांनी केली. यावेळी सामाजिक वनीकरणचे कर्मचारी व बामणीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
180921\img-20210918-wa0181.jpg
शिवार फेरी कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थ