बॉक्स
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची लागण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी प्रत्येक बसेस स्वच्छ धुऊन त्यांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. तसेच प्रवाशांना गर्दी न करण्याबाबत व तोडाला मास्क लावण्याबाबतच्या सूचना महामंडळाकडून देण्यात येत आहेत.
बॉक्स
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
चंद्रपूर जिल्ह्यातील चार डेपोमध्ये एकूण पाच शिवशाही बस आहेत. त्यापैकी चार बस या चंद्रपूर ते नागपूर मार्गावर धावतात. तर एक शिवशाही चंद्रपूर ते राजुरा मार्गावर धावते. यालाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण आगार ४
सुरू असलेल्या शिवशाही ५
एकूण शिवशाही ५
बॉक्स
सर्वच मार्गावर प्रतिसाद
रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ९० टक्क्यांच्या वर बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्याला प्रवाशांचासुद्धा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील चार आगारांतून पाच शिवशाही बस धावत आहेत. बसफेरी सोडण्यापूर्वी बसचे सॅनिटायझेशन करण्यात येते. शिवशाहीला काही प्रमाणात प्रवासी प्रतिसाद देत आहेत.
- स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर