कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. वरोरा शहर व परिसरात अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने वगळता इतर दुकाने उघडी असल्यास प्रशासनाच्यावतीने सील व दंड आकारणी सुरू केले आहे. वरोरा शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी असल्याची माहिती नगर प्रशासनास मिळाली. न. प. कर्मचारी पोहोचले असता, चप्पलजोडे विक्रीचे दुकान सुरू होते. त्याचे फोटो काढून महसूल विभागाकडे न. प. पथकाने पाठविले. त्यानंतर महसूलचे चार व न. प. चे दोन कर्मचाऱ्यांनी दुकान सील करण्याची कारवाई सुरू केली. यावरून दुकानदारांनी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणे सुरू केले. ही माहिती मिळताच नगराध्यक्ष अहतेश्याम अली तेथे पोहोचले. दुकानदारावर का कारवाई करता, असा प्रश्न त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झाले होते. पोलीस पोहोचताच वाद शांत झाला.
बाॅक्स
नगराध्यक्षांची कर्मचाऱ्याने केली तक्रार
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने मी व माझे सहकारी पोहोचलो. महसूल विभागात माहिती दिली. माझे सहकारी व महसूल विभागाचे कर्मचारी मिळून दुकान सील करण्याची कारवाई सुरू असताना, नगराध्यक्ष तिथे पोहोचले व हस्तक्षेप करीत शिवीगाळ केली. याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
- उमेश ब्राह्मणे, स्वच्छता निरीक्षक, न. प., वरोरा.
मी त्या ठिकाणी हस्तक्षेप करायला नाही, तर नागरिकांना शांत करावयास गेलो होतो. लॉकडाऊनमुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर तोडगा निघाला पाहिजे. मी कुणासही शिवीगाळ केली नाही.
- अहतेश्याम अली, नगराध्यक्ष, वरोरा.
===Photopath===
010621\img-20210601-wa0157.jpg
===Caption===
warora