चंद्रपूर : श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होत आहे. या महिन्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने मंदिरात जाऊन पूजाअर्चा करतात. मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोना संकटामुळे मंदिर बंद आहे. पुढील काही दिवस आणखी मंदिर बंदच राहण्याची शक्यता आहे. यावर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा आहे. त्यामुळे भाविकांना घरातून पूजाअर्चा करावी लागणार आहे.
चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याकडे बघितले जाते. आषाढी अमावस्या झाली की वातावरणात बदल होतो. श्रावण महिना सण-उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र कोरोना संकटामुळे मागील वर्षापासून जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन पूजापाठ करण्यावरही बंधने आली आहेत. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेे शासनाने प्रतिबंध घातले असून दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सण, उत्सव असतात. कोरोना संकटामुळे या उत्सवांवरही प्रतिबंध घातले जाण्याची शक्यता असून यावर्षीही श्रावणामध्ये मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.
बाॅक्स
श्रावण सोमवार
पहिला २६ जुलै
दुसरा २ ऑगस्ट
तिसरा ९ ऑगस्ट
चौथा १६ ऑगस्ट
फोटो
२५ जुलैपासून श्रावण
यावर्षी २५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यामध्ये सर्वच मंदिरांमध्ये पूजाअर्चना होत असते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे मंदिर अजूनही बंद आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातही मंदिर बंदच राहण्याची शक्यता आहे. परिणामी भाविकांना घरातून पूजाअर्चना करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही मंदिर बंद होते. त्यामुळे या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यावर्षीही नुकसान होण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यामध्ये पूजाअर्चनेच्या साहित्यातून लाखो रुपयांची दरवर्षी उलाढाल होते.
कोट
आम्ही दरवर्षी शिवमंदिरासमोर बेल, पान तसेच पूजेचे साहित्य विक्री करतो. मागील वर्षी मंदिर बंद होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले. यावर्षीही अद्याप मंदिर सुरू झाले नाही. श्रावण महिन्यातही मंदिर बंदच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीही नुकसान सहन करावे लागणार आहे.
- अर्चना नामेवार
कोट
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात जातात. पूजाअर्चना करतात. देवाला प्रसाद, बेलफूल चढवतात. त्यामुळे मंदिराबाहेर पूजेचे साहित्य विकून अनेक जण आपला उदरनिर्वाह करतात. मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मंदिर बंद आहे. त्यामुळे प्रत्येकाचे नुकसान होत आहे. श्रावण महिन्यात तरी मंदिर सुरू करावे.
- मारोती व्याहाडकर