शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

इनरव्हील क्लब एंजल्सतर्फे श्रावण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:31 AM

चंद्रपूर : मैत्री ही मानवाच्या जीवनातील सर्वात सुंदर नाते आहे. रक्ताचे नसले तरी शाश्वत टिकणारे अद्वितीय नाते आहे. हाच ...

चंद्रपूर : मैत्री ही मानवाच्या जीवनातील सर्वात सुंदर नाते आहे. रक्ताचे नसले तरी शाश्वत टिकणारे अद्वितीय नाते आहे. हाच मैत्रीचा धागा सदैव मजबूत राहावा, यासाठी इनरव्हील क्लब चांदा फोर्ट एंजल्सतर्फे व मुख्य शाखेतर्फे शकुंतला फार्मस येथे मैत्री दिन व श्रावण स्नेहमीलन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी श्रावण सरींचा आल्हाद व श्रावणमास मानवंदनाचे उपक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी नृत्य, गीत, गायन, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष आकर्षक व मन वेधण्यासाठी रॅम्प वॉक क्लबच्या पीडीसी वर्षा कोतपल्लीवार व अन्य पदाधिकारी व सदस्यानी केला. कार्यक्रमाची सुरुवात मंगला गौरी प्रार्थना व सामूहिक नृत्य करून करण्यात आली. यावेळी क्लब अध्यक्ष मुग्धा कोतपल्लीवार, उपाध्यक्ष स्मृती साने, सचिव स्नेहा राजा, क्लब प्रतिनिधी हर्षा शर्मा आदी उपस्थित होते.