लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरीच्या तलावावर नवरगाव-गडबोरी परिसरातील बरीच धान शेती अवलंबून आहे. तलावही सोडलेला आहे. परंतु ज्या कालव्याच्या सहायाने पाणी येते. त्यामध्ये झुडपे वाढली असून कचऱ्याचेही साम्राज्य आहे. यामुळे पाण्याच्या गतीला अडथळा निर्माण होत असून अनेक ठिकाणी कालवा फुटतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे. यावर्षीसुद्धा नवरगावकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ काढलेला नाही. केवळ कालव्यातील काही भागातील कचरा कापण्याचे काम करण्यात आले आहे. तर काही भागात अजूनही कचरा तसाच आहे. त्यामुळे पाणी वाहण्याची गती मंदावणार असून कालवा फुटण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या. परंतु संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही शेतकरी विभागाच्या कारभाराला कंटाळले असून स्वत:च पाण्याचे स्त्रोत निर्माण करीत आहेत.गाळ काढण्याची मागणीपाण्याचे नियोजन करण्यासाठी कालव्याला सिमेंट पायºया बसवून उपवितरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु बऱ्याच ठिकाणच्या पायऱ्या फुटल्या आहेत. या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याने घोडाझरी सिंचाई शाखेने पाण्याचे योग्य नियोजन करून कालव्यातील कचरा व गाळ काढून गडबोरी वानेरी, वाकड या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी कसे मिळेल, याचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.शेतकऱ्यांकडून स्वच्छतानवरगाव-गडबोरी या कालव्याची अशी स्थिती आहे. तर उपकालव्याची काय असेल,मध्येही कचºयाचे साम्राज्य आहे. ज्या शेतकºयांना गरज आहे असे शेतकरी उपकालव्यातील कचरा काढतात आणि पाणी मिळविण्याचा प्रयत्न करतात.
नवरगाव-गडबोरी कालव्यात वाढली झुडपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 5:00 AM
पूर्वी घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्यापूर्वी नवरगाव-गडबोरीकडे येणाऱ्या कालव्यातील गाळ, कचरा काढला जात होता. काही ठिकाणी कालवा फुटण्याची स्थिती असेल. त्या ठिकाणी पूर्वीच दुरुस्ती केली जात होती. परंतु अलीकडे घोडाझरी सिंचाई विभाग याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या परिस्थितीत कालवा आहे त्यातून पाणी सोडले जात आहे.
ठळक मुद्देघोडाझरी सिंचन विभागाचे दुर्लक्ष : मायनरचे पाणी शेवटपर्यंत पोहचतच नाही