जवळपास सर्वच कार्यालयात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे कर्मचारी व अधिकारी यामुळे धास्तावले आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर, नागरिक केवळ महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यांना शासनाच्या कामाची देणे-घेणे राहिलेले नाही. कार्यालयात वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर दिसून येत आहे. ५० टक्केच संख्या व कार्यालयीन काम सुरू आहे. संचारबंदीमुळे नागरिकही शासकीय कार्यालयात यायला घाबरत आहेत. सरकारी योजनांची अंमलबजावणी सुरू आहे, पण नागरिक येत नसतील, तर काय करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. याउलट नागरिकांची प्रतिक्रिया अशी की, सर्वाधिक संसर्ग हा शासकीय कार्यालयातून होत आहे. त्यामुळे शक्यतो शासकीय कार्यालयात जाणे आम्ही टाळत आहोत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शासकीय कार्यालयात स्थिती पूर्ववत दिसायला मिळेल.
बॉक्स
नुकसान भरपाईसाठी गर्दी नाही
एरवी नुकसान भरपाईकरिता नागरिकांची सरकारी कार्यालयसमोर तोबा गर्दी बघायला मिळत होती. आता कोविड व संचारबंदीमुळे नुकसानीची नोंद करण्यासाठीही नागरिक शासकीय कार्यालयात जायला धास्तावले आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावागावात जाऊन नुकसानीची नोंद करावी लागत आहे.