भद्रावती
: महाशिवरात्र उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे निर्देश राज्यातील सर्व मंदिरांच्या विश्वस्त व व्यवस्थापक यांना देण्यात आले होते. भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरातच राहून पूजाअर्चा करावी अशा सूचनाही करण्यात आल्या. त्या अनुषंगाने भद्रनाग स्वामी विश्वस्त मंडळातर्फे महाशिवरात्री पर्वावर भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
श्री भद्रानाग स्वामी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा व सप्ताह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. १० ते १२ मार्चपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले. गुरुवारी पहाटे ३ वाजता विश्वस्त मंडळाच्या वतीने भद्रनाग स्वामींना महाअभिषेक व रुद्राभिषेक करण्यात आला. त्याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रमेश मिलमिले, सचिव मधुकर सातपुते, कोषाध्यक्ष प्रकाश पामपट्टीवर, योगेश पांडे, मनोहर सहारे, निळकंठ एकरे उपस्थित होते.