शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सरकारी कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 10:02 PM

राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक, शिक्षक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा व नोव्हेंबर २००५ पासून निश्चित लाभाची पेन्शन योजना लागू करावी, यासह १४ मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून तीन दिवसाचा संप पुकारला आहे.

ठळक मुद्देशासकीय कामकाज ठप्प : जिल्हाभरातील शेकडो कर्मचारी संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक, शिक्षक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य सरकार विरोधात सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा व नोव्हेंबर २००५ पासून निश्चित लाभाची पेन्शन योजना लागू करावी, यासह १४ मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून तीन दिवसाचा संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महसूल विभाग, पुरवठा विभाग, जिल्हा परिषद कर्मचारी, पोलीस विभागातील तब्बल तीन हजारच्या जवळपास कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. परिणामी शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या अनेक नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. अनेक ठिकाणी मोर्चा काढून जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार महसूल व पुरवठा विभागाचे ५५६ पैकी ५०६ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर जिल्हा परिषद व पोलीस विभागातीलही शेकडो कर्मचारी सहभागी झाल्याने कामे ठप्प पडलेली दिसून आली.जिवती : येथील तहसील कार्यलयातील १५ अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहे तर पंचायत समितीचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह आरोग्य, शिक्षण विभागाच्या २६० कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने तालुक्यातील ९० टक्के शाळा बंद होत्या. तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट होता. एरव्ही येथे गर्दी असायची. मात्र दोन्ही कार्यलयात आज शुकशुकाट होता.ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील १८० कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे शासकीय कामांवर परिणाम दिसून आले.वरोरा : वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शेकडो शिक्षक पायवारी करीत तहसील कार्यालयात पोहचले. एका एका शिक्षकांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविले.घुग्घुस : परिसरातील जिल्हा परिषद शाळा, प्रियदर्शनी कन्या विद्यालयाचे शिक्षक, जनता विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सकाळपासून संपावर गेल्याने विद्यार्थ्यांना परत जावे लागले. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत्या. या संपात १७० कर्मचारी संपात सहभागी झाले होते.नागभीड : राज्य कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संपाचा येथील शासकीय व शैक्षणिक कामकाजावर परिणाम जाणवला. सर्व कर्मचाºयांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. शिक्षकांनी या संपात सहभाग नोंदविल्याने येथील शैक्षणिक संस्थांना शाळांना सुट्टी द्यावी लागली. तहसील कार्यालय, पं.स.च्या कर्मचाºयानीही संपात भाग घेतला. आरोग्य कर्मचारी संपात सहभागी होते, पण कंत्राटी डॉक्टर व कर्मचाºयांनी संपाची उणीव भासू दिली नाही. संपात सहभागी कर्मचाºयांची येथील तहसील कार्यालयात सभा झाली. त्यानंतर निवेदन देण्यात आले.पोंभुर्णा : येथील तहसील कार्यालय अंतर्गत कर्मचाºयांनी विविध घोषणा देत संपाला सुरूवात केली. तहसील कार्यालयासमोर मागण्यांबाबत घोषणा देत संप केला. यात जिल्हा परिषदेचे शिक्षक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.गडचांदूर : सातवा वेतन आयोग लागू करावा व महागाई भत्ता द्यावा अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन दिवसांचा संप सुरू केला आहे. या संपाला गडचांदूर शहरातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यात शाळा-महाविद्यायलयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. आणखी दोन दिवस संप सुरू राहणार असल्याने शासकीय कामकाजावर मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा आहेत मागण्यासातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, १ नोव्हेंबर २००५ पासून लाभची पेन्शन योजना मंजूर करावी, नोकर भरतीवरील बंद विनाविलंब रद्द करावी, कंत्राटी सेवेतील कर्मचाºयांना कायम करावे, ५० टक्के महागाई भत्ता मुळवेतनात वर्ग करावा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करून कामाचा आठवडा पाच दिवसाचा करावा, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाºयांना भत्ता मंजूर करावा, जात वैधता पडताळणी विनाा विलंब दूर करावी.संपामुळे शासकीय यंत्रणाच ठप्पचिमूर : मंगळवारी तालुक्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी संपावर गेले. परिणामी शासकीय यंत्रणाच ठप्प झाली आहे. सर्व शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. या संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य व शिक्षण क्षेत्रास बसला आहे. संपमध्ये आरोग्य विभागाचे ८६ पैकी ७२ कर्मचारी सहभागी झाले होते. याचा मोठा परिणाम रुग्णांना सहन करावा लागला. पंचायत समिती अंतर्गत येणारे ७८० पैकी ४९६ कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय व तालुक्यातील इतर शासकीय कार्यालयात येणाºया सर्व सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. या संपात महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती चिमूरचे ९५ टक्के शिक्षक संपात सहभागी झाल्याने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद होत्या. शिक्षक समितीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.बल्लारपुरात सरकारविरूद्ध घोषणाबाजीबल्लारपूर : येथील तहसील कार्यालय परिसरात अडीचशेच्या वर सरकारी कर्मचाºयांनी धरणे आंदोलनात सहभाग घेवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे येथील सरकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपविभागीय अध्यक्ष अजय मेकलवार, उपाध्यक्ष विजय उईके, सचिव दिपीका कोल्हे, कुणाल सोनकर, चंदू आगलावे, प्रमोद अडबाले, राजू अंडेलकर, पोर्णिमा नैताम, अर्चना गोहणे, स्मिता डोंगरे, प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष निलेश चिमड्यालवार, सचिव सुरेश नगराळे, धम्मदीप दखने, सोनाली पिंपळकर, सुनिल कोवे, वैशाली बावणे, महाराष्ट पुरोगामी शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज बुटले, गजानन चिंचोलकर, किशोर काकडे, आनंद सातपुते, संघपाल रामटेके, सुभाष सोनटक्के, संजय डाहुले कर्मचारी सहभागी झाले होते.