लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शुक्रवारी १२३ आणि गेल्या २४ तासात १२० नवे कोरोना रुग्ण आढळले. लागोपाठ दोन दिवस नव्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा जास्त येत असल्याने चंद्रपूर जिल्ह्याला आता कोरोना पुन्हा कवेत घेण्याची शक्यता यावरून दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या लाटेत ब्रह्मपुरी व चंद्रपूर हाॅटस्पाॅट ठरले होते. आता वरोरा तालुका हाॅटस्पाॅट ठरत आहे. गेल्या ४८ तासात वरोरा तालुक्यात अनुक्रमे ५९ व ६२ एवढे रुग्ण आढळले आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील एकूण आकडेवारीपेक्षा निम्मी आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३४ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ११६ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार १२८ झाली आहे. सध्या ५८८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख २१ हजार ६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ९४ हजार ७२६ नमुने निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ४०० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.शनिवारी बाधीत आलेल्या १२० रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २८, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर सात, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी तीन, नागभीड एक, सिंदेवाही तीन, मुल दोन, राजूरा सहा, वरोरा ६२ व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
वरोऱ्यात तीन दिवसात १५३ रुग्णवरोरा तालुक्यात १ मार्च रोजी केवळ १ रुग्ण आढळला. २ मार्च रोजी ४ रुग्ण आढळले. ३ मार्च रोजी एकही रुग्ण आढळला नव्हता. यानंतर तीन दिवसात १५३ रुग्ग आढळले. ४ मार्च रोजी अचानक २६ रुग्ण आढळले. यानंतर हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक म्हणजे ५ मार्च रोजी ५९ वर गेला. ६ मार्च रोजी पुन्हा ६३ रुग्ण आढळले. अचानक वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमुळे वरोरा तालुका कोराेनाच्या बाबतीत संवेदनशील होत असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर मनपा क्षेत्रात सहा दिवसात १४१ रुग्णांची भरवरोरा तालुक्याच्या पाठोपाठ चंद्रपूर महानगरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. १ मार्च रोजी ९, २ मार्च २९, ३ मार्च २३, ४ मार्च २०, ५ मार्च ३२, ६ मार्च रोजी २८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे सहा दिवसात १४१ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील आढळत असलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येवर तालुकानिहाय दृष्टी फिरवल्यास वरोरा सर्वाधिक रुग्ण वरोरा तालुक्यात तर या पाठोपाठ चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्राचा क्रमांक लागतो.
कोरोना कहर करण्याचे संकेतचंद्रपूर जिल्ह्यात पहिली कोरोनाची लाट उशिराने आली होती. आता दुसरी लाटही उशिराने येत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाचा कहर सुरू आहे. आता चंद्रपूर जिल्ह्याचीही या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे हे संकेत होऊ शकते.