शहरातून व ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना नागपूरला जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नाही. ग्रामीण क्षेत्रातील सिंदेवाही, तळोधी, मूल येथील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून व इतर कामांकरिता नागपूरला जावे लागत आहे. खासगी प्रवासी गाडीचे भाडे वाढले असून, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक भुर्दंड देऊन प्रवास करावा लागत आहे. महामंडळाची बससेवा शिवशाही, लालपरी सुविधा सुरू होती. परंतु आता नागपूर शहराकरिता एकही बस नसल्याने उद्घाटनापुरती शिवशाही सुरू केली की काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना व जनतेला पडत आहे. महामंडळाचे बस सुविधा नागपूरकरिता सुरू करावी. ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाची पास सुविधा असल्याने नागपूर प्रवास करण्याकरिता सोय उपलब्ध नाही. लवकर बसफेरी सुरू करण्याची मागणी आहे.
सिंदेवाहीकरांना हवी नागपूरसाठी थेट बसफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:20 AM