सिंदेवाही : आठवडी बाजार भरवू नये, अशा सूचना दिल्या असतानाही अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. खरेदीसाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्या पथकांनी कारवाई करीत आठवडी बाजार उठवला. त्यामुळे विक्रेत्यांची मोठी धावपळ झाली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आठवडी बाजार भरवू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केल्या होत्या. तशी सूचनाही सिंदेवाही नगरपंचायतीने दिली होती; मात्र तरीसुद्धा काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी झाली होती. दरम्यान, मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्या नेतृत्वात कारवाई करीत बाजार उठविण्यात आला. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांचीसुद्धा मोठी धावपळ झाली.
कोट
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठेही गर्दी करु नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा. शासन निर्देशाचे पालन करावे.
सुप्रिया राठोड, मुख्याधिकारी, नगरपंचायत सिंदेवाही