शनिवारी व रविवारी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक लॉकडाऊन पाळला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. काही अत्यावश्यक सेवेची दुकाने, मेडिकल, हास्पिटल सुरू होती; तर चौका-चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत होते. मनपाचे पथकही विनामास्क घालून फिरणाऱ्यांकडून दंड ठोठावत होते. पोलिसांचे पथक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची, वाहनधारकांची कसून चौकशी करीत होते. ज्याच्याकडे ठोस कारण नाहीत, अशांवर दंड ठोठावत होते. दोन दिवसांत पोलिसांनी ४८ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या प्रसादासोबतच दंडही भरावा लागला.
बॉक्स
शनिवारी झालेली कारवाई
चंद्रपूर शहरात चौका-चौकात पोलीस तपासणी करीत होते. यावेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्या सुमारे ८२ जणांवर कारवाई करून २० हजार ८०० रुपयांदा दंड ठोठावण्यात आला.
बॉक्स
रविवारी झालेली कारवाई
वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे रविवारी पोलिसांनी तपास मोहीम कडक केली होती. रविवारी १३१ जणांवर कारवाई करून २७ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.
बॉक्स
बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच
वीकेंड लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी पोलीस प्रशासनाकडून केल्यानंतर सर्वांची कारणे सारखीच आढळून आली. अनेकांनी रुग्णालयात डबा घेऊन चाललोय, औषधे आणायला मेडिकलमध्ये चाललोय, किराणा साहित्य आणण्यासाठी चाललोय, अशी कारणे पोलिसांना सांगितली.