चंद्रपूर : कोरोना संसर्ग होण्याचा वेग सातत्याने वाढत असल्याने कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. पॉझिटिव्हिटीचा रेट चिंताजनक झाल्याने बाधितांच्या कुटुंबांमध्ये मोठी धास्ती पसरली आहे. दरम्यान, अनेक खासगी रुग्णालय रुग्णांना घेतच नसल्याची स्थिती असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना भटकावे लागत आहे. जो तो एकमेकांना फोन करून रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्याची मागणी करीत असल्याचे विदारक चित्र सध्या चंद्रपूर शहरात बघायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारपर्यंत रुग्णांची संख्या ५ हजार २७८ पर्यंत पोहोचली आहे. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा शहरांची हाॅटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेटही बरा असला तरी बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढू लागली. पॉझिटिव्हिटी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत; मात्र रुग्णांचा ग्राफ वाढत असल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे.
एप्रिल महिन्यापासून आरटीपीसीआर व ॲन्टिजन चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे दरदिवशी जिल्ह्यात सुमारे आठशे ते नऊशे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत.
जसजशी रुग्णसंख्या वाढत आहे, तसतशी रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. प्रशासनाच्यावतीने पाठविण्यात येणाऱ्या प्रेसनोटमध्ये रुग्णालयात खाटा शिल्लक असल्याचे दाखविण्यात येत आहे; मात्र परिस्थिती दुसरीच असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यातच काल वन अकादमीमध्ये एका रुग्णाला बेड मिळाला नसल्याने त्याला तब्बल नऊ तास आवारात झोपून रहावे लागते. त्यानंतर त्या सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल झाल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने त्या रुग्णाला बेड उपलब्ध करून दिला. या घटनेमुळे मात्र प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाली आहे.
बाॅक्स
कुटुंबीयांची धावाधाव
नऊ खासगी हॉस्पिटलमध्ये हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) सुरू आहे. या सेंटर्समध्ये ५८६ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत, यातील ३७१ खाटा शिल्लक आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २४० पैकी ७५ खाटा शिल्लक राहिल्या. ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमधील राखीव ७५ पैकी ०, तर चंद्रपूर येथील पंत हॉस्पिटलमधील सर्वच २० खाटा फुल्ल झाल्या. मानवटकर हॉस्पिटलमध्ये ३० खाटा आहेत; मात्र या रुग्णालयात सद्यस्थितीत ५१ रुग्ण उपचार घेत आहेत.
बाॅक्स
२३१ रुग्ण ऑक्सिजनवर
जिल्ह्यातील २३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गंभीर लक्षणे असणारे ७९ व्हेंटिलेटरवर २८ रुग्ण तसेच २३१ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. संसर्गाचा वेग वाढत असल्याने शिल्लक असलेल्या ३७१ खाटा लवकरच फुल्ल होणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना भरती करण्यासाठी कुटुंबीयांना धावाधाव करावी लागणार आहे.
बाॅक्स
पुरुष रुग्ण
२०७३९
महिला रुग्ण
१२७९०
वयोगटानुसार रुग्ण
० ते ५
५०३
६ ते१८
२७५५
१९ ते ४०
१४६६६
४१ ते ६०
११६७४
६१ वर्षांवरील
३९३१
बाॅक्स
गृह विलगीकरण करण्यात आलेले रुग्ण
ग्रामीण-६५१८८४
शहरी २९९७८
मनपा २०५१३५