शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठीच्या सहा तासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 5:00 AM

विनाअनुदानीत कायमस्वरूपी विनाअनुदानित व सीबीएसईसह सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. एमएसईआरटीच्या परित्रकानुसार इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंच्या सर्व वर्गांना आठवड्यातून मराठीच्या सहा आणि दहावीकरिता चार तासिका अनिवार्य आहेत.

ठळक मुद्देजि.प.च्या सूचना : पहिली व सहावीसाठी मराठी भाषा अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्व शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासनाने अनुदानीत, विनाअनुदानीत कायमस्वरूपी विनाअनुदानित व सीबीएसईसह सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. एमएसईआरटीच्या परित्रकानुसार इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंच्या सर्व वर्गांना आठवड्यातून मराठीच्या सहा आणि दहावीकरिता चार तासिका अनिवार्य आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत.मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता पहिली व सहावीमध्ये सुरू होणार असून चढत्या क्रमानुसार पुढील वर्गात लागू करण्यात येणार आहे. यातूनच टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय पहिली ते दहावीपर्यंत एक सक्तीचा विषय म्हणून शिकविला जाईल.सर्व शाळांमध्ये मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बंध लादता येणार नाही. सोबतच मराठी भाषा बोलणाऱ्यावर निर्बंध लादणारा कोणताही फलक किंवा सूचना देता येणार नाही. प्रचलित अभ्यासक्रम व विषय योजनाअंमलबजावणीनुसार सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या राज्य अभ्यासक्रम राबवित असलेल्या मराठी, इंग्रजी व इतर माध्यमांच्या शासकीय, अनुदानित व खासगी अशा सर्व मान्यताप्राप्त शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा राहील, असे शासनाचे निर्देश असून तशा सूचना शाळांना दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.इतर माध्यमांच्या शासकीय, अनुदानित व खासगी अशा सर्व मान्यताप्राप्त शाळांमध्ये मराठी या विषयाची उपेक्षा करण्यात आली आहे. मराठीत आता अत्यंत दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे. मुलांच्या जाणिवा वैश्विक करण्यासाठी या निर्णयाची गरज होती.- प्रा. डॉ. इसादास भडकेमराठी भाषा अभ्यासक, चंद्रपूरइंग्रजी ही आंतरराष्ट्रीय ज्ञान भाषा आहे. मात्र, जगभरात ज्ञान भाषा म्हणून बोलींकडेही पाहिले जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये या विषयाकडे गंभीरतेने पाहिले जाईल का प्रश्नच आहे. खरे तर भाषा अभ्यासातून रोजगार मिळेल का, याचाही विचार व्हावा.- योगेश चामटे,मराठी शिक्षक, चंद्रपूर-अन्यथा शाळांना दंड अथवा मान्यता रद्दशासनाच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व शाळांना मराठी विषय विद्यार्थ्यांना शिकविण्याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शाळा एक सक्तीचा विषय म्हणून यापुढे मराठी शिकविणार नाही, अशा शाळेतील कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यवस्थापकीय संचालक किंवा संबंधित व्यक्तीला एक लाख रुपयाचा दंड तसेच शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याच्या सूचना जि. प. शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद