आॅनलाईन लोकमतवरोरा : तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, चारगाव येथील शेतकºयाने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे. पुढील हंगामात हे वाण बाजारपेठेत आणण्याचा संकल्प जाहीर केला. विशेष म्हणजे, या बियाणाला त्यांनी पत्नीचे नाव दिले आहे.चारगाव (बु.) येथील शेतकरी मधुकर भलमे हे मागील पाच वर्षांपासून तुरीचे पीक घेत आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची केवळ अडीच एकर शेती आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून ते इतरांची शेती भाड्याने करीत आहेत. दरवर्षी तुरीच्या पिकात काही झाडांना एका शेंगामध्ये पाच ते सहा दाणे आढळून आले. त्यामुळे तुरीचे पीक काढताना भलमे यांनी पाच ते सहा दाणे असलेल्या शेंगा इतर तुरीपासून वेगळे काढले. शिवाय, दरवर्षी वेगळ्या जागेत लागवड केले. हा प्रयोग मागील पाच वर्षांपासून सुरू होता. दरम्यान, भाड्याची शेती घेऊन लागवडीचे क्षेत्र सुमारे ७० एकरापर्यंत नेले. त्यामध्ये या नव्या बियाण्यांची लागवड केली. पाच ते सहा दाने असलेल्या तुरीच्या एका झाडाला एक हजार ते बाराशे शेंगा लागल्या आहेत. या विकसित तुरीच्या वाणाला पत्नी वदंना यांचे नाव दिले. पुढील हंगामात हे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती भलमे यांनी दिली.बैलाविना शेतीबैल व मजूर याशिवाय शेती होऊच शकत नाही. परंतु मधुकर भलमे एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडे तत्वावर शेती करीत असताना त्यांच्याकडे बैल नाही. लागवड, फवारणी, शेंडे खुडणे व काढणीपर्यंतची सर्वच कामे ते ट्रॅक्टरने करीत असतात.तुरीत आंतरपीक सोयाबीनतुरीच्या पिकात विशिष्ट अंतर ठेवून तुरीमध्ये सोयाबीन हे आंतरपीक मधुकर भलमे यांनी घेतले आहे. सोयाबीनचे पीक लवकर निघाल्यानंतर तूर पिकाची ट्रॅक्टरने आंतर मशागत केली जाते.
शेतकऱ्याने विकसित केले सहा दाण्याचे तुरीचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:41 PM
तुरीच्या शेंगामध्ये तीन ते चार दाणे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, चारगाव येथील शेतकºयाने एका तुरीच्या शेंगात सहा दाणे असलेली तूर विकसित केली आहे.
ठळक मुद्देपाच वर्षांच्या प्रयोगाला यश : वाणाला दिले पत्नीचे नाव