राकेश बोरकुंडवार।आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील सहा गावात मागील दोन महिन्यांपासून वाघाची दहशत आहे. दोन महिन्यात दोन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला असून एका वाघिणीचा झुंजीत मृत्यू झाला आहे. अनेकांना पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.९ डिसेंबरला तयागोंदी जंगलात आपल्या शेतावर काम करीत असताना कमला निकोडे हिच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. दुसºया दिवशी पट्टेदार वाघाची एक जोडी काही शेतकºयांनी किन्ही गावाजवळ पाहिली तर त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता देवयानी स्कूलजवळ वाघांनी धुमाकुळ घातला होता. त्यानंतर दहा दिवसांनी लोनवाही येथे ठाकूर यांच्या घराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट अडकला. २३ जानेवारीला चारगाव (डोंगरगाव) येथे दोन वाघिणीच्या झुंजीत एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. आता ३० जानेवारीला म्हणून मंगळवारी सायंकाळी ४ वाजता मुरमाडी येथील महिला गिता पेंदाम (४५) हिला वाघाने ठार केले.वाघाशी संबंधित असे विविध घटनाक्रम मागील दोन महिन्यात घडले आहेत. त्यामुळे या तालुक्यात एकापेक्षा अधिक वाघांचा वावर आहे, हे स्पष्ट झाले आहे. एफ.डी.सी.एम. व वनविभागाच्या अधिकाºयांची झोप उडाली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रामध्ये वाघाची संख्या वाढल्याचे वनविभागाचेही म्हणणे आहे.त्या तुलनेत सिंदेवाही तालुक्यातील जंगलात पाण्याचे स्रोत कमी आहे. त्यामुळे वाघ व इतर वन्यप्राणी गावाकडे वळत असल्याने अशा घटना घडत असल्याचे सांगण्यात येते.धाडसामुळे वाचले नातवाचे प्राणमंगळवारी गिता पेंदाम हिच्यावर वाघाने हल्ला केला, तेव्हा तिच्यासोबत तिचा १० वर्षाचा नातुसुद्धा होता. पण सोबत गेलेल्या चार महिला व अस्मिता दिवाकर पेंदाम या युवतीने वाघाच्या समोरून नातवाला धाडसाने ओढत दुसरीकडे नेले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.वाघाचे बुधवारीही दर्शनमंगळवारच्या घटनेनंतर बुधवारी सकाळी किन्ही गावातील महिला गाव तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यांना त्याच वाघाचे दर्शन झाल्याची माहिती महिलांनी दिली. किन्ही व मुरमाडी गावात सध्या एफ.डी.सी.एम. विभागाचे दहा ते बारा कर्मचारी सर्च मोहीम राबवित आहे. १२ कॅमेरे लावण्यात आले आहे.
सहा गावे पट्टेदार वाघाच्या दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:34 PM
सिंदेवाही तालुक्यातील सहा गावात मागील दोन महिन्यांपासून वाघाची दहशत आहे.
ठळक मुद्देसिंदेवाही तालुका : दोन महिन्यात दोन महिला ठार, एका वाघिणीचाही मृत्यू