लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा नाका ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी चक्क जुन्या व मोठ्या झाडांची कत्तल करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री १२ वाजता पर्यावरणप्रेमींनी तिथे पोहचत हाणून पाडला. तरीही दुभाजकावर लावलेली गुलमोहर व कन्हेरांची झाडांची कत्तल करण्यात आली.वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या भागात सध्या रस्ता दुभाजक स्थलांतरित करून रस्ता चौपदरीकरण करणे सुरु आहे. यापूर्वी येथे लाखो रुपये खर्च करून दुभाजक व फुलझाडे लावण्यात आली. परंतु ते बाधकाम चुकीचे होते की काय, पण बांधकाम विभागाकडून पुन्हा नव्याने दुभाजकाचे बांधकाम केले जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास संजय गाधी मार्केटजवळ संबंधित कंत्राटदाराने गुलमोहोराची सर्व झाडे तोडली. विश्रामगृह ते जुना वरोरा नाका या भागात दहा जुनी व मोठी कडुनिंबाची झाडे आहेत. या झाडांमुळे या भागात पर्यावरण संतुलनासाठी चांगली मदत होत आहे. या झाडांवरही संबंधित कंत्राटदाराची वक्रदृष्टी होती. मात्र याची माहिती मिळताच ग्रिन प्लॅनेटचे अध्यक्ष तथा पर्यावरणप्रेमी प्रा. सुरेश चोपणे व प्रा. वझलवार रात्री १२ वाजताच्या सुमारास जिथे झाडांची कत्तल होत होती, त्या ठिकाणी गेले. त्यांनी संबंधितांना विचारणा केली असता मनपाने १३ मोठी निंबाची झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे, असे सांगण्यात आले. मात्र याबाबत आपण महापालिकेला उद्या जाब विचारू, असे सांगत कोणतेही झाड आज तोडू नये, अशी तंबी दिली. त्यामुळे रात्रीच्या अंधारात होणारी मोठ्या झाडांची कत्तल थांबली. मात्र दुभाजकावरील गुलमोहर व कन्हेरांची झाडे तोडण्यात आलीच. झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली की नाही, याबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.झाडे तोडू नये, मनपा आयुक्तांना निवेदनया संदर्भात शुक्रवारी सकाळीच प्रा. सुरेश चोपणे आणि प्रा. वझलवार यांनी महापालिकेचे आयुक्त संजय काकडे यांना निवेदन दिले. चंद्रपूर-नागपूर रोड च्या प्रियदर्शिनी चौक ते जुना वरोरा नाका या भागात सध्या रस्ता दुभाजक स्थलांतरित करून रस्ता चौपदरीकरण करणे सुरु आहे. या कामात रस्त्याचा मध्य साधून दुभाजक करण्यामुळे काही जुनी झाडे तोडण्याची भीती आहे. विश्रामगृह ते जुना वरोरा नाका या भागात अशी दहा जुनी व मोठी कडुनिंबाची झाडे आहेत जी या बांधकामात तोडल्या जाऊ शकतात. या रस्त्यावर वृक्षांमुळे कधीही रहदारीला अडथळा निर्माण झालेला नाही. सध्याच्या रुंदीकरणात विश्राम गृहाच्या गेट समोरील एक झाड वगळता समोरील सर्व झाडे सुरक्षित राखून देखील हे रुंदीकरण केल्या जाऊ शकते. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वृक्षांची अनावश्यक कत्तल टाळावी, अशी मागणी त्यांनी केली.
रुंदीकरणात झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 6:00 AM
वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या भागात सध्या रस्ता दुभाजक स्थलांतरित करून रस्ता चौपदरीकरण करणे सुरु आहे. यापूर्वी येथे लाखो रुपये खर्च करून दुभाजक व फुलझाडे लावण्यात आली. परंतु ते बाधकाम चुकीचे होते की काय, पण बांधकाम विभागाकडून पुन्हा नव्याने दुभाजकाचे बांधकाम केले जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास संजय गाधी मार्केटजवळ संबंधित कंत्राटदाराने गुलमोहोराची सर्व झाडे तोडली.
ठळक मुद्देमध्यरात्री घडला प्रकार : पर्यावरणप्रेमी पोहचल्याने झाडे बचावली