शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

स्लीपर कोच ट्रॅव्हल्सचा अपघात, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

By राजेश भोजेकर | Published: July 15, 2023 12:59 PM

जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

मूल (चंद्रपूर) : मूल-चंद्रपूर मार्गावरील एम.आय.डी.सी.परीसरात स्लीपर कोच ट्रॅव्हल्सला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. १५ जुलै रोजी मध्यरात्री रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रायपूरवरुन हैदराबादला जवळपास ४५ मजुर प्रवासी घेऊन भरधाव जाणारी स्लीपर कोच टायगर कंपनीची ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटले. गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर मूल नजीक एमआयडीसी टी पाँईटजवळ ती भरधाव असल्याने रस्त्याच्या कडेला शेतात जाऊन पलटली. जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

मूल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात सुदैवाने जिवितहानी झाली नाही. या ट्रॅव्हल्सचा चालक इसराइल खान (४०) रा. शिवनी मध्यप्रदेश याचेवर कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात कुणीही गंभीर जखमी नसल्याचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूर