लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चंद्रपूर जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यावर आपला भर राहणार आहे. माझा मतदार संघ ब्रह्मपुरी असला तरी जिल्ह्यातील सर्वच मतदार संघामध्ये विकास घडवून आणायचा आहे. यामध्ये शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रम राहिल. याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात एक स्मार्ट योजना लवकरच येणार असल्याची माहितीही सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विजय वडेट्टीवार पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, येथील गांधी चौकात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन सुविधा येत्या ३ वर्षांच्या काळात उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.अलीकडेच राज्याच्या कॅबिनेटमध्ये एका स्मार्ट योजनेवर प्रात्याक्षिक झाले. जागतिक बँकेच्या सहकार्याने ही योजना आखली जात आहे. ही योजना विशेष करून शेतकरी व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून आखण्यात येत आहे. शेतकरी आणि व्यापारी यामध्ये शेतकऱ्यांना होणाऱ्या तोट्याचे फायद्यात रुपांतर करणे हा योजनेचा मुख्य हेतू असणार आहे. ज्या भागात जी पिके घेतली जातात. त्या भागात त्याच पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले जाण्यावर सरकारचा भर असावा, याकडे आपण स्वत: कॅबिनेटचे लक्ष वेधले. याचा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहितीही ना. वडेट्टीवार या योजनेबाबत सांगताना दिली. याप्रसंगी खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष नंदू नागरकर, रामू तिवारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात नामवंत उद्योग आणण्याचा प्रयत्नचंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील सुमारे १५० उद्योग गेल्या पाचसात वर्षांत बंद पडले आहेत. दरम्यान नवा एकही उद्योग आला नाही. एमआयडीसीमध्ये नामवंत उद्योग यावे, अशी आपली भावना आहे. मुख्यमंत्र्यांचाही यादृष्टीने प्रयत्न आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.प्रदूषणावर आळा घालण्यासाठी समिती नेमणारचंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. या प्रदूषणावर आळा घालायचा असेल तर याची कारणेही शोधणे गरजेचे आहे. यासाठी तज्ज्ञांची एक समिती आगामी काळात गठित केली जाईल. ही समिती प्रदूषणाची कारणांसह त्यावर उपाययोजनांचाही अभ्यास करतील, अशी माहितीही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांसाठी स्मार्ट योजना येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:00 AM
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन सुविधा येत्या ३ वर्षांच्या काळात उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जिल्ह्याचा समतोल विकास साधणार, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर