शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

झोपडीत दरवळला यशाचा सुवास !

By admin | Published: June 18, 2014 12:08 AM

यशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरयशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला परिस्थिती रोखू शकली नाही, हेच यंदाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.चंद्रपुरातील बाबूपेठ परिसरातील समता चौकालगतच्या एका गल्लीत तो राहतो. त्याचे वडील लोकांच्या कपड्यांना इस्त्री करून कुटुंब चालवितात. आई हाताला मिळेल ते काम करून कुटुंबाचा गाडा ओढते. वडील बीए तर, आई बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली. वडिलाचे सातत्याने मार्गदर्शन असायचे. या वातावरणावरही वृषभने मात केली. त्याच्या यशाचे ‘लोकमत’पर्यंत पोहचले तेव्हा, त्याचे छायाचित्र घेण्यासाठी ही चमू घरी पोहचली. मात्र मुलाच्या यशाचे कौतूक करावे म्हणून पेढा भरविण्याएवढेही पैसेही या मातेजवळ नव्हते. घराचे छप्पर एवढे फाटलेले, की अवचित आलेल्या पावसाने घरभर पाणी पसरलेले ! परिस्थितीने या कुटुंबाच्या आनंदावर मात केली असली तरील, वृषभने मात्र अपार यश गाठून आपल्या यशाने या सर्व परिस्थितीवरच मात केली आहे. या यशाबद्दल त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, तीन वर्षापूर्वी आपण मोबाईलवर व्हिडीओ क्लिप बघितली. ‘आपले स्वप्न मनात ठेवा, त्यावर सातत्याने विचार करा आणि मोठे व्हा’, असे त्या क्लिपमध्ये दाखविण्यात आले होते. तेव्हापासूनच आपण प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उरात बाळगले. दहावीमध्ये किमान ९८ टक्के गुण मिळविण्याचा ध्यास घेतला. आपल्या घरच्या आरश्याजवळ मोठ्या अक्षरात ‘आपल्याला दहाव्या वर्गात १०० टक्के गुण घ्यायचे आहे’, अशी पट्टी चिपकवून ठेवली. अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांच्या परिश्रमामुळे आपल्याला ९७ टक्के गुण मिळाल्याचे त्याने सांगितले.दरवर्षी दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर अनेकांचे फोटो पेपरमध्ये येतात. आपलाही यावा असे मनात वाटत होते. रोज चार ते सहा तास अभ्यास आणि शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण यश मिळवू शकल्याचे तो म्हणाला. आपण आयआयटी इंजिनिअरिंग करणार असून त्यानंतर युपीएससीची तयारी करून प्रशासकीय सेवेत जाऊन सामान्य नागरिकांची सेवा करणार असल्याचा त्याचा निर्धार आहे.