राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील ५५ हजार थकीत मालमत्ताधारकांनी कर भरण्यास विलंब केला. त्यामुळे मनपाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उद्दिष्टानुसार आॅक्टोबरपर्यंत ४६ ते ५२ कोटी रूपये कर वसुली करणे गरजेचे होते. मात्र मालमत्ताधारकांनी कर भरण्याकडे कानाडोळा केल्याने मनपा प्रशासनाने मोबाईलद्वारे ‘एसएमएस’ पाठवून अलर्ट करणे सुरू केले. आॅक्टोबरपर्यंत १४ कोटींचीच वसुली झाल्याची माहिती पुढे आली आहे.चंद्रपूर महानगरपालिकेचा आर्थिक गाडा हा नागरिकांकडून येणाऱ्या कर वसुलीच्या आधारावरच चालतो. केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमाने मिळणारा निधी आणि मालमत्ता धारकांकडून मिळणार कर यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. शहरातील विकासकामे करण्यासाठी मनपाला निधीची गरज भासते. निधीअभावी ३६ प्रभागामध्ये विकासकामे करताना मनपाची दमछाक होण्याची चिन्हे दिसत आहेत.एक हजार रूपयांपेक्षा अधिक रूपये कर थकित ठेवणाºया मालमत्ताधारकांची संख्या शहरात लाखोंच्या घरात आहे. २०१८-१९ या वर्षातील उद्दिष्टानुसार कर वसूल करण्यासाठी संबंधित विभागाच्या पथक जोमाने मोहीम सुरू केली. परंतु वसुलीच्या उद्दिष्टानुसार अद्याप टक्केवारी गाठता आली नाही. आतापर्यंत १४ कोटींची वसुली झाली आहे.या वर्षातील उर्वरित ३२ कोटींची वसुली करण्यासाठी शहरातील तब्बल ५५ हजार थकीत मालमत्ता धारकांना मोबाईलद्वारे एसएमएस पाठवून अलर्ट करण्यात आले. विहित मुदतीत कर न भरणाºया थकबाकीदारांची मालमत्ता जप्त नोटीसा पाठविण्याची तयारीही मनपाने सुरू केली आहे.१२ हजार थकबाीदारांना जप्ती नोटीसकर भरणा न करणाºया शहरातील १२ हजार मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. मुदत संपूनही कर भरण्यास संबंधित मालमत्ताधारक दुर्लक्ष करत आहेत. अशा थकबाकीदारांना डिमांड व जप्ती नोटीसा पाठविण्यात आल्या. ३१ डिसेंबरपर्यंत कर भरला नाही तर संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई मनपा हाती घेणार आहे.झोन क्र. २ मध्ये सर्वात कमी वसुलीचंद्रपूर शहरातील मनपाच्या झोन क्रमांक २ मध्ये आॅक्टोबरपर्यंत सर्वांत कमी कर वसूली झाली आहे. अन्य तीन झोनमध्ये तुलनेने उद्दिष्टांच्या जवळपास कर वसुली करण्यात आली. कमी वसुली असणाºया झोन दोनमध्ये बाजार वार्ड, कोतवाली वार्ड, समाधी, एकोरी, विठ्ठल मंदिर, पठाणपुरा आदी वॉर्डांचा समावेश आहे.
५५ हजार थकबाकीदारांना मनपाचा ‘एसएमएस’ अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:31 PM
शहरातील ५५ हजार थकीत मालमत्ताधारकांनी कर भरण्यास विलंब केला. त्यामुळे मनपाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, उद्दिष्टानुसार आॅक्टोबरपर्यंत ४६ ते ५२ कोटी रूपये कर वसुली करणे गरजेचे होते.
ठळक मुद्देकेवळ ३० टक्केच वसुली : ३२ कोटी वसुलीचे मनपापुढे आव्हान