विरूर परिसरात सर्रास विक्री : दारूसारखा अवैध पुरवठाशाहु नारनवरे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूर (स्टे.) : पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीटी कपाशीचे वाण शेजारच्या तेलंगणा राज्यातून तस्करी करून राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन परिसरातील अनेक गावात सर्रासपणे विकले जात आहे. उत्पादनाची कुठलीही खात्री नसलेले हे वाण कोणतीही पावती न देता शेतकऱ्यांना विकले जात आहे. तसेच शेतकरीदेखील ते बियाणे बिनधास्तपणे विकत घेत आहेत. तेलंगणात बीटी कंपशीचे बियाणे स्वस्त दरात मिळत असून नफे खोरीच्या नादात बनावट बियाणांची विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नगदी पीक म्हणून कापूस पीक चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लावले जात आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नफेखोरीच्या नादात तालुक्यातील अनेक गावाच्या शेतकऱ्यांच्या माथी बीटी कापसाचे वाण देत आहेत. यातून फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्यांकडे कोणतीही कारवाई करता येऊ नये, यासाठी बनावट बियाणे विक्रेता बियाणे विक्रीचा कोणताही पुरावा मागे सोडत नाही. त्यातून अनेक शेतकऱ्याची फ सवणूक झाली आहे. यापरिसरात अनेक दलालही सक्रिय झाले आहेत. बीटी हे वाण पर्यावरण व शेतीसाठी घातक असतानाही शेतकरी त्याची शेतात लागवड करीत आहेत. या बियाणांच्या झाडावर तणनाशकाची फवारणी केली तरी त्या झाडाला कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे निंदणाच्या खर्चाची बचत होते. मागील दोन-तीन वर्षांपासून हा प्रयो यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कल चोर बीटी बियाण्यांच्या लागवाडीकडे वाढला आहे. याप्रकारे अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी या बियाणाला अद्याप कोणतेही परवानगी किंवा मान्यता नाही. त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन विक्रेता या भागात मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे विक्रीसाठी सक्रिय झाले आहेत. शेतकऱ्यामध्ये काही कृषी केंद्राच्या माध्यमातून या बियाण्यांची विक्री होत असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागवड चोर बीटी बियाण्यांची झाली आहे. विरूर व परिसरात त्याचा मोठ्या प्रमाणात अवैध व्यापार सुरू आहे. एका पॅकेटला १००० ते १२०० रूपयांप्रमाणे अवैध विक्री सुरू असल्याची खमंग चर्चा आहे.या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून त्यासोबत जमिनीचीही पोत खालावली जाणार आहे. तरी शेतकरीवर्ग जमिनीचा विचार न करता बोगस बियाणे घेण्यास इच्छूक असल्याचे दिसत आहे. या बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमणात होण्यासाठी परिसरातील काही कृषी केंद्रचालक घरपोच सेवा देत आहेत. त्याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच जमिनीचा पोतही खालावली जाऊ शकतो. तसे झाल्यास शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची पााळी वेळ येऊ शकते.याकडे जिल्हा कृषी अधिकारी व तालुका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना रास्त भावात बियाणे व खत पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
बंदी घातलेल्या बियाण्यांची तेलंगणातून तस्करी
By admin | Published: June 30, 2017 12:55 AM