लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्नेहमीलन सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येवून आपले ऋणानुबंध दृढ करीत असतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपले संबंध कायम टिकवण्यासाठी समाज बांधवांनी आपुलकीच्या नात्यामधून परस्परामध्ये स्नेह जपावा, असे प्रतिपादन खैरे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांनी केले.खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूरच्या वतीने स्थानिक पंचवटी लॉन येथे आयोजित स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन म्हणून ते बोलत होते. त्यांनी यासारख्या कार्यक्रमामधून समाजबांधवांनी आपल्या अंगी असलेले सुप्त गुण, विविध कलांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य डॉ.आसावरी देवतळे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सहसचिव दिनकर ठोंबरे, एम.के. ट्रेडर्सचे मनोज कळसकर, समाजाचे सचिव जे.डी. पोटे, प्रा.सुधाकर पांडव, जयंत लांडगे, आनंद कुडे, गणपत कुडे, पुनाबाई चिमूरकर, सुमन चाफले, गीता कुडे, विजय धंदरे, प्रा.निलेश ढेकरे, अॅड. राकेश अवघडे, नरेंद्र पेटकर, घनश्याम गोहणे, अमरदीप खोडके, बालाजी पाल, शैलजा कळसकर, विलास खडसे, श्यामराव धानोरकर आदींची उपस्थिती होती.यावेळी डॉ.आसावरी देवतळे यांनी आपण कितीही मोठे झालो तरी समाज ऋण विसरू नये, असा सल्ला दिला. याप्रसंगी शैलजा कळसकर, निरंजना पोटे, मंजुषा डंभारे, अरुण भोयर, विठ्ठल धोटे, विजय चिताडे, प्रशालिनी पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा पार पडल्या. प्रास्ताविक जे.डी. पोटे यांनी तर संचालन अरुण भोयर, शैलजा कळसकर यांनी केले. आभार किरण नागापूरे यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची मोठी उपस्थित होती.
खैरे कुणबी समाजाचे स्नेहमीलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 10:11 PM
स्नेहमीलन सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येवून आपले ऋणानुबंध दृढ करीत असतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
ठळक मुद्देविजय देवतळे : आपुलकीच्या नात्यामधून परस्परांत स्नेह जपावा