वरोरा : वरोरा तालुक्यातील शेगाव येथील सर्पमित्र राकेश भूतकर याने आजपर्यंत चारशेच्या वर सापांना जीवनदान दिले आहे. साप महटले की, अंगावर शहारे व मनात भीती निर्माण होते. मात्र, शेगावातील सर्पमित्र राकेश याला सापाचे वेड आहे. कुठेही साप निघाला, तर अगोदर राकेशला फोन येतो व राकेश हातातील काम बाजूला सारून साप पकडण्याची काठी घेऊन साप पकडायला निघतो. शेगाव परिसरात लहान-मोठ्या खेड्यात कुठलीही अपेक्षा न करता, तो आपले काम इमाने इतबारे गेल्या सहा ते सात वर्षांपासून करीत आहे. त्याने आतापर्यंत चारशेहून अधिक साप पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. त्याच्या सोबतीला अक्षय बोंदगुलवार, शुभम मेश्राम हे येतात. बुधवारी त्यांनी तीन नाग जातीच्या सापांना पकडून मेसा येथील घनदाट जंगलात सोडले. आपले जीव धोक्यात टाकून जिवंत सापांना जीवनदान देणारे सर्पमित्र मात्र शासनाकडून उपेक्षित आहेत.
===Photopath===
300621\img-20210628-wa0099.jpg
===Caption===
image