शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

आतापर्यंत १२३ व्यक्ती क्वारंटाईनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:00 AM

जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. सद्यस्थितीत फक्त ३२ प्रवासी निगराणीमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसºया टप्प्याच्या सुरुवातीला स्वत:ला व कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये हजरत निजामूद्दीन परीसरात गेल्या काही दिवसात आढळून आलेल्या ३९ नागरिकांची यादी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : विदेशातील ३२ प्रवासी निगरानीत, यापुढचे १४ दिवस पुन्हा महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : ३१ मार्चच्या पहिल्या टप्प्यातून आता दुसºया टप्प्याकडे आपण वळत असून या काळात अधिक रुग्ण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या सर्व सुचनांचे पालन करावे व पुन्हा १४ दिवस घरातून बाहेर निघू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. सद्यस्थितीत फक्त ३२ प्रवासी निगराणीमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला स्वत:ला व कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये हजरत निजामूद्दीन परीसरात गेल्या काही दिवसात आढळून आलेल्या ३९ नागरिकांची यादी प्राप्त झाली आहे. यासर्व व्यक्तींशी संपर्क साधला असून यामधील एकाच व्यक्तीने दग्यार्तील मरगजमध्ये सहभाग घेतला आहे.इतर व्यक्ती केवळ प्रवासी आहेत.त्यांचा मरगजशी संबंध नाही ज्या एका व्यक्तीचा संबंध आहे त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.जिल्ह्यामध्ये ३३ शेल्टर होममध्ये ३ हजार ७०० विविध राज्यातील नागरिक आश्रयाला आहेत. या सर्वांच्या खानपानापासून तर राहण्यापर्यंतची व्यवस्था जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आली आहे. या सर्व नागरिकांनी कोणतीही काळजी न करता पुढील आदेशापर्यंत आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी केले. जिल्ह्यात विपुल प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध असून स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत येणाऱ्या मदतीला जिल्ह्यामध्ये महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत वितरण सुरू आहे.चंद्रपुरात नाकाबंदी कडकचंद्रपूर : देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. प्रशासनही दररोज जनतेला घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहेत. असे असताना शहरातील रस्त्यांवर दुचाकीस्वारांची गर्दी बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरातील नाकाबंदी आणखी कडक केली आहे. चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या नागपूर मार्गावर वडगाव, मूलकडून येणाºया मार्गावरील बंगाली कॅम्प या शिवाय रामनगर पोलीस ठाणे, जटपुरा गेट येथील नाक्यावर वाहनधारकांना अडवून विनाकामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र यात काही प्रमाणात शिथिलता होती. मात्र नागरिकांचे बाहेर निघण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे हे नाके आता कडक झाले आहेत. बुधवारी प्रियदर्शिनी चौकालगत शहरातून येणाऱ्या मार्गावर नव्याने नाकाबंदी केली आहे.आयुध निर्माणी १४ एप्रिलपर्यंत बंदयेथील आयुध निर्माणी३१ मार्च २०२० पर्यंत बंद होते. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ही मुदत १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पही १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.फिलीपिन्सच्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्हभद्रावती: फिलीपिन्स येथून आयुध निर्माणी वसाहतीत आलेल्या व वैद्यकीय चाचणी न करता घरीच बसलेल्या एका व्यक्तीला प्रशासनाने ग्रामीण रूग्णालयात बुधवारी दाखल केले. या व्यक्तीचा वैद्यकीय निगेटीव्ह आल्याने क्वारंटाईनवर ठेवण्यात आले आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता संकटावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाºयांचे तालुकास्तरावर प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणात आशा वर्करपासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रांमध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.रिकामटेकड्यांना बेशरम झाडाचा गुलदस्ताघुग्घुस : लॉकडाऊन असताना विनाकारण दुचाकीने फिरणाºया रिकामटेकड्या युवकांना ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी बेशरम झाडाचे गुलदस्ते देऊन सत्कार केला. यापुढे घराबाहेर निघाल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली. संचारबंदी दरम्यान शहरातील ९ दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली.''‘मार्निंग वॉक’ वर गदानागभीड : सकाळी फिरायला जाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. मात्र संचारबंदी लागू झाल्याने मार्निंग वॉकवरही गदा आली आहे. नागभीड येथे शिवटेकडी परिसर, रेल्वेस्थानक, परसोडी रस्ता व तुकूम हे रस्ते फिरायला जाणाºयांसाठी सोयीचे आहेत. संचारबंदीमुळे सकाळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.सभा घेतल्याने पर्यवेक्षिकेला नोटीसशंकरपूर : संचारबंदी असताना शंकरपूर व किटाळी सर्कलच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकाने सभा घेतल्याने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली. पर्यवेक्षिका पौर्णिमा राठोड यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून मंगळवारी केंद्रात अंगणवाडी सेविकाची सभा घेतली. राठोड यांच्याकडे शंकरपूर व किटाडी या दोन सर्कलचा पदभार असून ५० अंगणवाडी केंद्र येतात.मदत कक्षातच साहित्य जमा कराबल्लारपूर : शहरातील सेवाभावी संस्थांनी गरजूंना परस्पर जीवनोपयोगी साहित्य वाटप न करता नगर परिषदेने तयार केलेल्या मदत कक्षातच जमा करावे, असे आवाहन न. प. केले.१७० व्यक्तींचे होम क्वांरंटाईनमाजरी : प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २१ गावातील १७० नागरिकांना होम ‘क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले. ७० नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले असून सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले. १०० व्यक्ती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निगरणीत आहेत. प्रत्येक तासाला मोबाईलवर कॉल करून प्रकृतीची चौकशी केली जात आहे.पासेसशिवाय दुचाकी बाहेर काढल्यास कडक कारवाईजिल्हा प्रशासनाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी गाड्या बाहेर पडायला लागल्यामुळे नागरिकांना आता दुचाकी गाडी चालविण्यासाठी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाºया नागरिकांनाच फक्त संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांकडून पासेसवर परवानगी मिळणार आहे. त्यामुळे घराबाहेर दुचाकी घेऊन निघाल्यास कारवाई होणार आहे.अंत्योदय कुटुंबांना मोफत तांदूळजिल्ह्यातील नागरिकांना अन्नधान्य देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून ३१ मार्च रोजी नवीन निर्देश प्राप्त झाले आहे. या निर्देशानुसार माहे एप्रिल २०२० मध्ये फक्त माहे एप्रिल महिन्याचे धान्य वितरित केले जाणार आहे. हे धान्य विकत घेणाºया नागरिकांनाच याच एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत ज्यांच्याकडे अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेची शिधापत्रिका आहेत, अशा लोकांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. जे लाभार्थी विकत धान्य घेतील अशाच शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केला जाणार आहे. शिधापत्रिकेवरील अन्नधान्य घेताना एकाच वेळेस दोनपेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस