शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अन्नदानातून सामाजिक बांधिलकी

By admin | Published: January 10, 2015 10:51 PM

प्राणाची बाजी लावून सैनिक देशसेवा करतात. आपलेही योगदान देशासाठी असावे, यास्तव विदर्भातील तरुण सध्या सैन्यभरतीसाठी चंद्रपुरात दाखल झाले आहे. मात्र त्यांच्या राहण्यासह

चंद्र्रपूर : प्राणाची बाजी लावून सैनिक देशसेवा करतात. आपलेही योगदान देशासाठी असावे, यास्तव विदर्भातील तरुण सध्या सैन्यभरतीसाठी चंद्रपुरात दाखल झाले आहे. मात्र त्यांच्या राहण्यासह भोजनाची व्यवस्था नसल्याने अनेकवेळा मिळेल त्या ठिकाणी राहून सैन्य भरतीची चाचणी देत आहे. भावी सैनिकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी येथील काही संस्था समोर आल्या आहे. ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघानेही यात पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या तरुणांच्या भोजनाची जबाबदारी त्यांनी स्विकारून अन्नदानाची सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ६ जानेवारीपासून सैन्य भरती सुरु आहे. येणाऱ्या तरुणांच्या भोजनासाठी येथील ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघाने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर स्टॉल उभारून जेवणाची व्यवस्था केली आहे. एक दोन दिवस नाही तर १२ दिवस त्यांची ही मोहिम सुरु राहणार आहे. या माध्यमातून ते किमान ४० हजार तरुणांना भोजनदान करणार आहे. यासाठी न्यू इंग्लिश हायस्कूलने मैदान दिले आहे. महानगरपालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतेची जबाबदारी घेतली आहे. यासाठी ज्येष्ठ व्हॉलीबॉल संघाचे प्रदीप जानवे, दीपक जेऊरकर, अरुण येरावार, स्वामी कापरबोयना, शेखभाई, प्रशांत उपगन्लावार, श्याम थेरे, मु्न्ना ठाकूर, सिद्धार्थ वाघमारे, विठ्ठल दुरटकर, मकरंद खाडे, प्रकाश सुर्वे, राहूल पावडे आदी सहकार्य करीत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सदर उपक्रम नागरिकांना प्रेरणा देणारा असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)