ते स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था व टायगर ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना बालाजी सभागृहात बोलत होते. यावेळी मेश्राम पुढे म्हणाले, सरकारने शिक्षणासाठी विविध उपाययोजना काढल्या आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा, कुण्या दुसऱ्यांवर विसंबून राहू नका, सोबतच जातीवर मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घ्या, जेणेकरून आपली व समाजाची प्रगती होईल. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय समाजासाठी मला जे करता येईल त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेल. असेही ते म्हणाले. यावेळी त्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विदर्भ भोई समाज आघाडीच्या रंजना पारशिवे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नागपुरे, नगरसेविका शीतल गेडाम, माजी अध्यक्ष दिलीप मांढरे, भारत नागपुरे, भोई समाज तालुका अध्यक्ष सुनील पारशिवे, उमा नागपुरे, अंजना पढाल, माधुरी गेडाम, मनोहर नागपुरे, सुनील पढाल, अनंता मांढरे, आशिष कार्लेकर, संभाजी मांढरे, टायगर ग्रुपचे रुपेश मांढरे, विनोद नागपुरे, गोरख कामतवार आदी उपस्थित होते.
समाजबांधवांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण द्यावे- चंद्रालाल मेश्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:19 AM