घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा पणन महासंघ व आदिवासी सोसायटयांमध्ये धानास जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सोसायटयांकडे वाढला आहे. नागभीड तालुक्यात ८ आदिवासी सोसाटयांमार्फत धान खरेदी सुरू आहे. ९ जानेवारीच्या आकडेवारीनुसार या ८ सोसायटयांनी २४ हजार ८९ क्विंटल धान खरेदी केली आहे.नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे.मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसत आहे. शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायटयांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायटयांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या बोनसमध्ये आणखी २०० रूपयांची वाढ झाल्याची माहिती काही शेतकºयांनी दिली. मात्र यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळ चिमूर प्रकल्पाचे व्यवस्थापक जी. आर. राठोड यांच्याशी संपर्क केला पण संपर्क झाला नाही.अशी आहे सोसायटयांची धान खरेदीआदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायटयांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यात नवखळा सोसायटीने १३९१.८१ क्विंटल, चिंधी चक सोसायटीने ३३१२.६४ क्विंटल, गोविंदपूर २८१४.४५ क्विंटल, कोजबी (माल) सोसायटीने ३६९२.३२ क्विंटल, गिरगाव सोसायटीने ७०१.२० क्विंटल, सावरगाव सोसायटीने ५९३०.०५ क्विंटल, जीवनापूर सोसायटीने ३०२२.३९ क्विंटल, बाळापूर सोसायटीने ३२२४.७६ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. याशिवाय पणन महासंघातर्फे येथील खरेदी विक्री संघ व कोर्धा येथील राईस मील येथेही धान खरेदी सुरू आहे.
सोसायट्यांनी केली २४ हजार क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:41 AM
नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे.
ठळक मुद्देसंडे अॅन्कर । नागभीड तालुक्यात आठ आदिवासी सोसायट्या