बांबू उपलब्ध करून देण्याची मागणी
बह्मपुरी : तालुक्यात बांबू कामगारांची संख्या बरीच आहे. बांबूपासून विविध वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांना पुरेसा बांबू उपलब्ध करून दिल्यास अडचणींचा सामना करावा लागणार नाही़. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़
आदिवासी योजनांची अंमलबजावणी करावी
चंद्रपूर : आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्या योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे़.
एटीएममध्ये ठणठणाट
चंद्रपूर : जिल्ह्यातील मोठ्या गावातील बँक शाखांमध्ये एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र मागील अनेक दिवसापासून एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट दिसून येत आहे. तांत्रिक अडचणीमुळे एटीएम मशीन नेहमी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे़. विशेष म्हणजे, ग्राहकांना कमी रक्कम असल्यास बँक पैसेसुद्धा देत नाही. त्यामुळे एटीएमशिवाय त्यांना पर्यायच नसतो.