पीकविम्याच्या रकमेची प्रतीक्षा
चंद्रपूर : शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहे. आता हंगाम सुरू झाला असून
शेतकऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीक विम्याची रक्कम देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यावसायिकांना ओळखपत्र द्यावे
चंद्रपूर : शहरातील फुटपाथवर व अनेक ठिकाणी लघु व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली. व्यावसायिकांकडून मनपा कर वसूल करीत आहे. शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळणे कठीण झाले. शहरातील व्यावसायिकांना ओळखपत्र देण्याची मागणी केली जात आहे.
झुडपे ठरत आहेत जीवघेणे
चंद्रपूर : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आता पावसाचे दिवस आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले असते. अशावेळी झुडपामुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मामा तलावांची डागडुजी करावी
चंद्रपूर: पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने मामा तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या जलसाठा कमी असल्यामुळे हे काम करणे शक्य आहे. दुरुस्तीमुळे तलावातील पाणीसाठा शिल्लक राहून तो उन्हाळ्याच्या दिवसात कामी येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
जलकुंभ ठरले शोभेच्या वास्तू
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्याच्या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांना नियमत आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.