या संदर्भात बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख, राजेश ब्राह्मणे, सरफराज शेख, मनोज वानखेडे, नागेश, राकेश ठमके यांनी मजीप्राचे उपविभागीय अभियंता सुशील पाटील यांना निवेदन देऊन पाण्याचे बिल मीटर रीडिंगप्रमाणे पाठविण्यात यावे. वस्ती विभागात बिल भरण्याचे केंद्र सुरू करावे. ऑनलाईन नळ बिल भरण्याची सुविधा करावी. कापलेल्या नळाचे बिल देणे बंद करावे. बल्लारपूरला पाणी नियमित जात नाही ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी केली.
आम आदमी पार्टीने शहरात अनेक ठिकाणी पाईपमधून पाण्याची गळती सुरू असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. विवेकानंद वॉर्डात पाण्याची गळती होत असल्याची माहिती मजीप्राच्या कर्मचाऱ्याला आम आदमी पार्टीचे शहर संयोजक रवी पुप्पलवार यांनी दिली असता त्यांनी अभद्र भाषेचा वापर केला. याबाबत त्या कर्मचाऱ्यास मजीप्रा अधिकाऱ्यांनी समज देण्यासाठी निवेदन देण्यात आले. वेळीअवेळी रीडिंग घेणाऱ्या मजीप्रा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गौतम काकडे, वासुदेव नरांजे, विजया वाणे, खुशाल चंद्र उराडे, कैलास निमगडे, रवी मेश्राम, संध्या रामटेके, अनिल सुखदेवे, पार्वताबाई सिडाम, महेश मेश्राम, बंडू कासवटे, मंदा गेडाम व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.