लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावरील विविध न्याय मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी अनेकदा निवेदन सादर करुन शिक्षण अधिकाºयांना अवगत करण्यात आले. परंतु समस्यांचा निपटारा झाला नाही. प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडविण्यात याव्या म्हणून शिक्षक भारती संघाचे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर यांना निवेदन देण्यात आले.जिल्ह्यात २० टक्के अनुदान पात्र शाळेतील तुकड्याचे वेतन मार्च २०१७ पासून प्रलंबित आहे. त्याचा निपटारा करण्यात यावा, शिक्षण खात्यात मंडळ व खाते मान्यता प्रस्ताव प्राप्त झाल्यावर आठवड्याच्या आत शाळांना वर्गीकृत करण्यात यावे, २० टक्के अनुदान प्राप्त शाळांना अनुदानात वाढ करावी, वर्ग १ ते ८ पर्यंतच्या अनुदानीत शाळांच्या धर्तीवर विना अनुदानीत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व मोफत पाठ्यपुस्तकांची शासकीय सुविधा पुरविण्यात यावी, त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर मुक्त विद्यालय संकल्पना रद्द करवून शासन निर्णय मागे घेण्याची मागणी व अन्य समस्या निकालात काढण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी शिक्षणाधिकाºयांकडे मांडल्या.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राम गारकर यांच्या सोबत प्रलंबित शैक्षणिक समस्या निकालात काढण्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. दरम्यान आवश्यक प्रलंबित समस्या सोडविण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने शिक्षक भारतीच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. निवेदन देणाºयात शिक्षक भारतीचे अध्क्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, कार्याध्यक्ष रमेश पायपरे, राजू पारोधे, महिला जिल्हाध्यक्ष स्मिता ठाकरे, के.व्ही. रेड्डी, रेखा सिंग, प्रदीप गर्गेलवार आदी उपस्थित होते.
प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:13 AM
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावरील विविध न्याय मागण्या प्रलंबित आहेत.
ठळक मुद्देशिक्षक भारतीतर्फे निवेदन : उच्च माध्यमिक शाळेतील समस्या